ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

*संघर्ष काळातील अनुभव हेच खरे यशाचे मार्गदर्शक – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार*

*ब्रम्हपुरी येथे युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिर*

*🔸अरविंद चहांदे*

*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*

*🔸मो.940571416

5*

आयुष्यात यश मिळवण्यासाठी सातत्य, इच्छाशक्ती व मेहनत फार महत्वाची आहे. यशाकडे वाटचाल करतांना अनेकदा आपल्याला अपयश येऊ शकते तेव्हा खचुन न जाता यशस्वी होण्यासाठी संघर्ष करत राहा. कारण आयुष्यात संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नसतो असे मौलिक विचार राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
ब्रम्हपूरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

यावेळी मंचावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मोटीव्हेशनल स्पीकर डॉ. वैदेही जंजाळे, प्रा. आकाश मेश्राम तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता प्रतीनीधी मुकेश मुंजनकर, शासकीय तंत्रनिकेतन प्राचार्य आर.वानखेडे, डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे, न.प.माजी बांधकाम सभापती विलास विखार, माजी नगरसेवक हितेंद्र राऊत, माजी न.प.उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्ननील कावळे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य राजेश डांगे यांची यावेळी मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, १० वी व १२ वीचे वर्ष हे आयुष्यातील टर्निंग पॉइंट असतात. यावेळी घेतलेला चुकीचा निर्णय आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळे ज्या क्षेत्रात जास्तीत जास्त संधी उपलब्ध होतात ते क्षेत्र निवडावे. एकवेळ उपाशी राहा पण शिक्षण पुर्ण करा. कारण आयुष्यात शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. चीन देश विकसित राष्ट्र आहे. तेथील युवकांनी तंत्रज्ञानाचा वापर स्वतःसह राष्ट्राच्या विकासासाठी केला आहे. त्यामुळे ह्याबाबतीत आपण सर्व विद्यार्थ्यांनी गांभीर्याने विचार करून एक सजग नागरिक बनावे असे देखील यावेळी ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेंडे यांनी तर आभारप्रदर्शन रत्नदीप रामटेके यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.