ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

गिट्टी क्रेशर मुळे नंदोरी, भटाळी, डोंगरगाव प्रदूषणाच्या विळख्यात..

▪️आप जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा यांची प्रदूषण विभागाला तक्रार..

 

मुख्य संपादक तथा संचालक श्री. तुळशीराम जांभूळकर

भद्रावती – ( इंडिया 24 न्यूज ) : दि. 20 जून 2024 रोजी आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष व वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सुरज शहा यांना देवसेना फाऊंडेशन चे निखिल ताजने यांच्या माध्यमातून काही गावकऱ्यांची तक्रार प्राप्त झाली की भद्रावती तालुक्यातील नंदोरी, भटाळी, डोंगरगाव व इतर काही गाव गिट्टी क्रेशर मुळे प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. तिथे होणाऱ्या जळ वाहतुकी मुळे रस्त्याचा हाल बेहाल होत असून, ये – जा करणाऱ्या गावकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. मागील 1 वर्षा अगोदर याच भागात गिट्टी खदान मधे एका बाप आणि पोराला जीव गमावावा लागला होता. जळ वाहतुक मुळे वाढत्या प्रदूषणामुळे गावकऱ्यांच्या शरीरात फुफ्फुसांची बिमारी चा प्रमाण वाढत आहे. गिट्टी खदान मधे होणाऱ्या ब्लास्टिंग मुळे गावकऱ्यांच्या घराला नुकसान होऊन घर आज पडण्याच्या मार्गावर होऊन आहे. या सगळ्या समस्या असून गिट्टी क्रेशर चे मालकांना सांगून सुद्धा आमच्या मदतीला धाव घेत नाही व कोणतेच नेते हे समस्या हाती घेऊन मार्गी लावण्यासाठी तयार नाही आहे असा आक्रोश व्यक्त करत गावकऱ्यांनी आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा यांना मनोगत सांगितले. ही समस्या गृहीत धरून सुरज शहा यांनी गावाची पाहणी केली तेव्हा तिथे खूप मोठ्या प्रमाणात जळ वाहतुकी मुळे प्रदूषण होत असून प्रदूषण रोखण्यासाठी गिट्टी क्रेशर मालकांकडून काही उपाय योजना करण्यात आलेल्या नाही, झाडे सुद्धा लावण्यात आले नाही, रस्त्यावर पाणी सुद्धा मारण्यात आले नाही, गिट्टी खदान व रस्त्याच्या बाजूला संरक्षण भिंत बांधली नाही हे बघून या सर्व समस्येला मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे गावकऱ्यांना आश्वासन दिले व तत्काळ या विषयी प्रदूषण नियंत्रण मंडळ याची भेट घेऊन सविस्तर विषयाची माहिती उघडकीस आणली व या समस्येची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना देऊन समस्येला 7 दिवसात मार्गी लावा अन्यथा समस्त गावकऱ्यांना घेऊन आंदोलन करू असे अल्टिमेटम जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा यांनी प्रदूषण मंडळाला दिले. यावेळी आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, चंद्रपूर महानगर महिला अध्यक्षा ॲड. तब्बसुम शेख, निखिल ताजने, प्रेम दुधलकर, अक्षय नेहारे, साहिल झिले, गणेश भडगरे, छोटू वानखेडे, दीपक थेरे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.