ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️भाजपा सावली तालुक्याची संघटनात्मक बैठक..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

सावली – ( इंडिया 24 न्यूज ) : भारतीय जनता पार्टी तालुका सावली च्या वतीने आज दिं.२७ जून २०२४ रोज गुरूवार ला जे.के.पाल सायन्स काँलेज व्याहाड खुर्द येथे भाजपा पदाधिकाऱ्यांसह सहविचार मंथन, समिक्षा तथा संघटनात्मक बैठक तालुकाध्यक्ष मान.श्री. अविनाश पाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीला प्रामुख्याने तालुकाध्यक्ष अविनाश पाल, कोषाध्यक्ष अर्जुन भोयर,जेष्ठ नेते दौलतजी भोपये,माजी पं.स सदस्य गणपतजी कोठारे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रकाश पा.गड्डमवार,महिला आघाडी च्या तालुकाध्यक्षा पुष्पा शेरकी,शोभा बाबनवाडे, प्रतिभाताई बोबाटे, माजी जि.प.सदस्या योगिताताई डबले, दिवाकर गेडाम,किशोर वाकुडकर,अरूण पाल,डॉक्टर कवठे,अरूण खेवले,नामदेव भोयर,नरेंद्र मस्के, कोमदेव मस्के, नानु उंदिरवाडे,विलास खरवडे,चंद्रकांत नवघडे,अभय लाटकर,मुक्तेश्वर थोरात,यशवंत बारसागडे,संतोष चौधरी, प्रफुल्ल गोहणे,अतूल ठाकुर,सुरेश ढोले तसेच अनेक कार्यकर्ते आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

या सहविचार मंथन व संघटनात्मक बैठकीला तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांनी विचार व्यक्त करतांना म्हणाले की,भाजपा सावली तालुक्याचा पक्ष संघटनेचे काम अतिशय चांगले व प्रभावीपणे आहे. आगामी लोकसभा २०२४ च्या झालेल्या निवडणूकीत पराभव झाला यांच्यावर चिंतन व मंथन केले.जय पराजय होणे साहजिकच आहे. पराभवाला खचून न जाता पक्ष संघटनेचे सतत काम करत राहावे. लोकसभा निवडणुकीत सावली तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी चांगले पक्ष संघटनेचे काम केले त्याबद्दल अभिनंदन व आभार व्यक्त करतो. आज शेतकऱ्यांच्या पेरणीचे काम जोरात सुरु असून पक्ष संघटनेसाठी व बैठकीला उपस्थित झाले. त्यामुळे उपस्थितांचे आभार व्यक्त करत मान.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन कि बात शेवटच्या महिन्याच्या दि.३० जून.रवीवार ला प्रक्षेपण पाहावा.व एक पेड माँ के नाम हा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा.असे उत्कृष्ट मार्गदर्शन भाजपा विचार मंथन व संघटनेच्या बैठकीला तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांनी केले.

या बैठकीचे प्रास्ताविक व संचालन दिवाकर गेडाम यांनी केले.या बैठकीला कोषाध्यक्ष अर्जुन भोयर यांनी सुद्धा विचार व्यक्त केले.

यावेळी आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकी मध्ये उपस्थितांनी बैठकीत चर्चा केली असता ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात मागील जी पक्ष श्रेष्ठीनी भाजपाला उमेदवारी न देता शिवसेना पक्षाला उमेदवारी दिली ती आता चुक करू नये ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राची उमेदवारी हि भाजपा पक्षाला व स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य द्यावा. असा सुर उपस्थितांमध्ये मागणी द्वारे व्यक्त केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.