ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️निर्यातक्षम फळबागांची हॉर्टीनेट प्रणालीवर शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन – विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ

 

संपादक सौ शिल्पा बनपुरकर

धुळे, दिनांक 28 जून 2024 ( इंडिया 24 न्यूज ) : निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनी हॉर्टीनेट प्रणालीवर निर्यातक्षम पिकांची शेतनोंदणी करावी, असे आवाहन नाशिक विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

राज्यातून फळे व भाजीपाला पिकांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी व आयातदार देशांच्या किडनाशक उर्वरित अंश व किड रोग मुक्ततेबाबतची हमी देण्यासाठी सन 2004-2005 पासून ग्रेपनेट या ऑनलाइन कार्यप्रणालीची अंमलबजावणी सुरू आहे. 2023-2024 मध्ये द्राक्षासाठी ग्रेपनेट प्रणालीवर 28 हजार 624, आंब्यासाठी मँगोनेट प्रणालीवर 138, भाजीपाल्यासाठी व्हेजनेट प्रणालीवर 165, केळीची आदर फ्रुटनेट प्रणालीवर 201 अशी एकूण 29 हजार 195 शेतांची नोंदणी झालेली आहे. राज्यात नाशिक विभाग निर्यातक्षम नोंदणीत प्रथमस्थांनावर आहे.

सन 2024-2024 वर्षांमध्ये फळ व भाजीपाला निर्यातीस चालना देण्यासाठी कृषि विभागामार्फत खास उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर कृषि माल निर्यात मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तसेच फळे व भाजीपाला ऑनलाईन नोंदणीसाठी फार्म रजिस्ट्रेशनची मोबाईल ॲपचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. निर्यातीबरोबरच स्थानीक बाजारपेठेत ग्राहकांना किड व रोगमुक्त फळे व भाजीपाला उपलब्ध करुन देण्यासाठी नाशिक विभागात नाशिक 45 हजार 090, धुळे 350, नंदुरबार 350 व जळगाव 1 हजार 200 असा एकूण 46 हजार 990 बागांची नोंदणीचे लक्षांक देण्यात आले आहे. द्राक्ष बागांची नोंदणी करण्यास 31 जानेवारी 2024 पर्यंत तर आंबा बागाची नोंदणी करण्यास 31 डिसेंबर 2024, आंबा बागांची नोंदणी करण्यास 31 मार्च,2025 मुदत देण्यात आली आहे. तसेच इतर फळे व भाजीपाला पिकांची नोंदणी वर्षभर सुरु असते.

गतवर्षीच्या तुलनेत सद्य स्थितीत शेतनोंदणी अत्यंत अल्प झाली असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी निर्यातक्षम पिकांची शेतनोंदणी संबंधित प्रणालीवर करावी, अधिक माहितीसाठी कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन विभागीय कृषि सहसंचालक श्री.वाघ यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.