ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️बहुजन जनता दलाचे अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे बाळापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार

▪️लवकरच बाळापुर मतदार संघाचा जनसंपर्क संवाद दौरा करणार.

 

मुख्य संपादक तथा संचालक श्री तुळशीराम जांभूळकर

अकोला – ( इंडिया 24 न्यूज ) : दि. बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय बाळापुर व पातुर तालुक्यातील बहुजन जनता दलाचे कार्यकर्त व पदाधिकारी यांच्यासोबत विचार नियम व चर्चा करून घेतला असून त्यांनी निवडणुकीची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू केली असून
पंडितभाऊ दाभाडे हे लवकरच बाळापुर मतदार संघातील वाडेगाव पातुर व बाळापूर येथे जनसंपर्क कार्यालय सुरू करून बाळापुर मतदार संघातील सामान्य नागरिकांचे प्रश्न व मतदार संघातील शेतकरी शेतमजूर कामगार विद्यार्थी महिला यांच्या प्रश्नांचे निवारण करणार आहेत आणि बाळापुर मतदार संघातील उगवा आगर बदलापूर अमरपुर ताकोडा पारस खंडाळा माणगाव उरळ वाडेगाव तुलंगा लावखेड चांदणी चतारी अंबिकापुर आलेगाव शिरला यांच्यासह मतदारसंघातील अनेक गावांचा जनसंपर्क संवाद दौरा करणार आहेत.
‌ बहुजन जनता दलाच्या माध्यमातून पंडितभाऊ दाभाडे यांनी राज्यभरात बहुजन जनता दलाच्या कार्यकर्त्यांचे व पदाधिकारी यांचे मोठे जाळे विणले आहे पंडितभाऊ दाभाडे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात अकोला जिल्ह्यातून सुरू केली असून प्रथम ते शेतकरी संघटनेचे नेते दिवंगत शरद जोशी यांच्या स्वतंत्र भारत पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सक्रिय होते त्यानंतर अखिल भारतीय सेनेचे पक्षप्रमुख अरुणभाई गवळी यांनी स्थापन केलेले अखिल भारतीय सेनेमध्ये त्यांनी प्रवेश करून अकोला जिल्ह्यात कामाला सुरुवात केली पंडितभाऊ दाभाडे यांनी शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख इथपर्यंत मजल मारत जिल्ह्यात कार्य केले त्यामुळे अकोला जिल्ह्यात पंडितभाऊ दाभाडे यांचा दांडगा परिचय असून या जिल्ह्यामध्ये त्यांनी अनेक आंदोलने मोर्चे सामाजिक राजकीय शैक्षणिक कार्य केले असून अकोला जिल्ह्यासह बाळापुर मतदार संघातील मतदार व नागरिकांचे जिव्हाळांचे संबंध आहेत त्यामुळेच बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बाळापुर मतदार संघ हा निवडणुकीसाठी निवडला असल्याचेही बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी सांगितले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.