ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️बांधकाम कामगारांच्या नोंदणी कार्ड वाटप व नूतनीकरणासाठी वेळापत्रक जाहीर :सरकारी कामगार अधिकारी मधुरा सुर्यवंशी

 

संपादक सौ. शिल्पा बनपुरकर

धुळे, दि. 8 जुलै, 2024 ( इंडिया 24 न्यूज ) : सरकारी कामगार अधिकारी, धुळे या कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेले महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र, धुळे येथे बांधकाम कामगारांच्या नोंदणी कार्ड वाटप व नूतनीकरणासाठी तालुकानिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अशी माहिती सरकारी कामगार अधिकारी मधुरा सुर्यवंशी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

सरकारी कामगार अधिकारी, धुळे या कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेले महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र, धुळे येथे बांधकाम कामगाराची नोंदणी कार्ड वाटप व नूतनीकरणाचे कामकाज चालते. भारत निवडणूक आयोग व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्या सूचनेनुसार 16 मार्च, 2024 पासून लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची आचारसंहीता लागू झाल्यामुळे नोंदणी कार्ड वाटप व नूतनीकरणासाठी कामकाज बंद करण्यात आले होते.

लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक संपल्यानंतर नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीला सुरुवात झाली. त्यामुळे आचारसंहीता नियमित चालू होती. त्यामुळे कार्यालयाचे कामकाज हे गेल्या तीन महिन्यांपासून बंद होते. हे कामकाज 8 जुलै, 2024 पासून नियमितपणे सुरु झाले आहे. बऱ्याच दिवसांपासून मंडळाचे कामकाज बंद असल्यामुळे काम सुरु झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगार हे एकाच वेळी कार्यालयात येवून बांधकाम कामगारांचे मंजूर झालेले कार्ड व पावती घेण्यासाठी एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी बांधकाम कामगारांची गर्दी व गैरसोय टाळण्यासाठी कार्यालयामार्फत कार्ड वाटप, पावती, नूतनीकरण करणेकामी तालुकानिहाय महिन्याच्या प्रत्येक वारास खालीलप्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे. सोमवार धुळे ग्रामीण, मंगळवार धुळे शहर, बुधवार साक्री, गुरुवार शिंदखेडा तसेच शुक्रवारी कार्यालयीन कामकाजासाठी राखीव आहे.

तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वर नमूद केलेल्या वारास कामगांरानी आपले नोंदणी कार्ड वाटप व नूतनीकरणासाठी यावेत, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी मधुरा सुर्यवंशी यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.