ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️अन्याय प्रतिकार दल संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी रामप्रसाद भोले यांची निवड…

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

माजलगाव – ( इंडिया 24 न्यूज ) : गेल्या अनेक वर्षापासून छ. शिवाजी महाराज,
फुले, शाहू,आंबेडकर, मौलाना आझाद, परिवर्तन चळवळीमध्ये काम करत असताना दलित सेना राष्ट्रीय भिमसेना अशा संघटनेत कामे करून दलित चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याने याची दखल घेत “अन्याय प्रतिकार दल” या संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी रामप्रसाद भोले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

दलित शोषित पीडित अल्पसंख्याक आदिवासी भटके विमुक्त समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लोकशाही मार्गाने लढा उभारून त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे असे मत रामप्रसाद भोले यांनी मांडले आहे.
लवकरच बीड जिल्ह्यातील सर्व तालुके व तालुक्यातील गावांमध्ये “अन्याय प्रतिकार दल” या संघटनेच्या शाखा स्थापन करून हे संघटन जास्तीत जास्त मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे असेही ते म्हणाले
त्यांच्या निवडीने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.