ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️ज्ञनज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची 15 जुलै 2024 पर्यंत असलेली मुदत वाढविण्यात यावी- सचिन राजुरकर

 

संपादक सौ. शिल्पा बनपुरकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या वर्षीपासून लागु केलेली आहे. व सदरील योजनेकरीता अर्ज भरण्याची मुदत हि 15 जुलै 2024 ठेवण्यात आलेली आहे.परंतु या योजनेचा लाभ घेतांना प्रवेश झालेल्या महाविद्यालयाकडून बोनाफाईड प्रमाणपत्र व अर्जावर प्राचार्यांची स्वाक्षरी/शिक्का आवश्यक आहे. अनेक अभ्यासक्रमांचे निकाल जाहिर न झाल्याने व काही अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले असले तरी शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया अद्याप झालेली नसल्याने विद्यार्थ्यांनी बोनाफाईड प्रमाणपत्र व प्राचार्याची सही आणावी कुठून असा प्रश्न उपस्थित होतो. व अशा तांत्रिक कारंणामुळे अनेक गरजु विद्यार्थी या योजनेच्या लाभापासून वंचीत राहून त्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची 15 जुलै 2024 पर्यंत असलेली मुदत वाढविण्यात यावी आणि तसेच शासनाचे दिनांक 9 मार्च 2015 चे शासन परीपत्रक असताना सुद्धा विद्यार्थ्याकडून शपथपत्रावर व स्वयघोषणापतत्रावर नोटरी करून मागण्यात आले आहे ही अट रद्द करावी अशी मागणी राष्ट्रीय ओबिसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी पत्राद्वारे इतर मागस व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे आणि संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, पुणे यांचेकडे केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.