ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

*समाजातील दुर्बल घटकांचे स्वप्न साकारून त्यांच्या विकासाला चालना देणे हेच खरे लोकप्रतिनिधित्व – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार*

*सावली येथे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सकल ढीवर समाजा तर्फे जाहीर सत्कार*

*🔸अरविंद चहांदे*

*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*

*🔸मो.940571416

5*

मनुष्याने स्वतःच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावे. मात्र समाजातील ईतर दुर्बल समाजाच्या व्यथांची जाणीव राखून त्यांच्या समस्या व मूलभूत सोयींकरिता सदैव प्रयत्नशील असावे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करित असताना समाजातील दुर्बल घटकांचे स्वप्न साकारून त्यांच्या विकासाला चालना देणे हेच खरे लोकप्रतिनिधित्व होय.असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सावली येथे सकल ढीवर समाजा तर्फे आयोजित जाहीर सत्कार समारंभात सत्कारमूर्ती म्हणुन बोलत होते.

आयोजित सत्कार समारंभास प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती दिनेश चिटनुरवार, माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत ताडाम, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नितीन गोहने, विमुक्त जाती, भटक्या जमाती सेल जिल्हाध्यक्ष तथा माजी प. स. सभापती विजय कोरेवार, माजी प.स. सभापती राकेश गड्डमवार, काँग्रेस शहराध्यक्ष विजय मुत्यालवार, नगराध्यक्ष लता लाकडे, उप नगराध्यक्ष संदीप पुण्यारपवार, काँग्रेस महिला आघाडी तालुका अध्यक्ष उषा भोयर, शहराध्यक्ष भारती चौधरी, विमुक्त जाती, भटक्या जमाती सेल अध्यक्ष्य हरिदास मेश्राम,युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर कारडे, शहराध्यक्ष अमरदिप कोनपत्तीवार तथा काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी, नगरसेवक, ग्राम काँग्रेस कमिटी पदाधिकारी व कार्यकर्ते तथा बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कालावधीत दोन वर्षे कोरोना महामारीच्या प्रकोपात गेले. त्यानंतरही महाविकास आघाडी सरकारने समाज उपयोगी अशा अनेक योजना आणल्या. तर मी ईतर मागास बहुजन कल्याण मंत्री असताना समाजातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील दुर्बल घटकांच्या समस्यांना डोळ्यापुढे ठेवून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अमलात आणली. व राज्यातील अनेकांना हक्काचे घर मिळाले. मात्र सरकार जाताच नव्या सरकारने या योजनेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. तर आपण विरोधी बाकावर असताना सुद्धा जनतेचे प्रश्न तेवढेच हिरीरीने सोडवून आज एकट्या ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात 3493 घरकुल मंजूर करून घेतली. यात आमचे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तथा गाव पातळीवरील प्रतिनिधी यांच्या पाठपुराव्याचे यश असून पुढेही जनसेवेचे कार्य अविरत सुरू राहील. सोबतच ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात घडवून आणलेली सिंचन क्रांती , विकास कामे, सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची निराकरण, व क्षेत्र विकासासाठी आपण चालविलेले प्रयत्न व दिन दुबळ्यांचे अश्रू पुसण्याचे कार्य हे सार्थकी ठरले. यातच मी पूर्णतः समाधानी असल्याचेही ते यावेळी म्हणाले. व उर्वरित लाभार्थ्यांचेही घरकुलांची स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी एकट्या सावली तालुक्यात 2365 घरकुलांना मंजुरी मिळवून दिल्याबद्दल सकल ढीवर समाज तालुका सावलीच्या वतीने विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

तर विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेला सततचा पाठपुरावा व शासस्तरावर चालविले प्रयत्न यामुळे तालुक्याच्या वाट्याला हजारोंच्या संख्येने मिळालेले घरकुलरुपी यश हे विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजाला विकासाची नवी दिशा मिळाल्याचे मत माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती दिनेश चिटनुरवार तथा विमुक्त जाती व भटक्या जमाती सेल जिल्हाध्यक्ष विजय कोरेवार यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण गेडाम, प्रस्ताविक तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नितीन गोहणे यांनी केले. आयोजित कार्यक्रमाप्रसंगी सावली तालुक्यातील हजारोंच्या संख्येने नागरिक व लाभार्थी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.