आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️विभागीय महिला लोकशाही दिनाचे १२ ऑगस्ट रोजी आयोजन..

मुख्य संपादक तथा संचालक श्री. तुळशीराम जांभूळकर

नाशिक, दिनांक: १० ऑगस्ट, २०२४ ( इंडिया 24 न्यूज ) : विभागीय महिला लोकशाही दिनाचे सोमवार १२ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे, असे उपायुक्त, माहिला व बाल विकास कार्यालयाने कळविले आहे.

समस्याग्रस्त व पीडित महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागस्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. महिला लोकशाही दिनी महिलांच्या हक्कांचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा यासाठी शासकीय यंत्रणांकडून समाजातील पीडित महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

यापूर्वी ज्या समस्याग्रस्त व पीडित महिलांना तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर महिला लोकशाही दिनात अर्ज केले असतील व समस्यांचे निराकरण झाले नसेल त्यांनी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाच्या टोकन क्रमांकसह आपले अर्ज १२ ऑगस्ट, २०२४ रोजी विभागीय महिला लोकशाही दिनात सादर करावेत,असेही कळविण्यात आले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.