आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपुर शहरात पुन्हा गोळीबार, हाजी सरवर शेख चा मृत्यू..

मुख्य संपादक तथा संचालक श्री तुळशीराम जांभूळकर 

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) चंद्रपुर शहरात गोळीबारी च्या घटना सातत्याने वाढवताना दिसून येत आहे. अशीच खळबळजनक घटना आज पुन्हा चंद्रपुर शहरात घडली आहे. आज दुपारच्या सुमारामध्ये बिनबा गेट जवळील “शाही दरबार” या हॉटेलमध्ये जेवण करीत असताना भर दिवसा हाजी अली शेख याच्यावर अंधाधुंद गोळीबार तसेच तलवारी ने हल्ला करण्यात आला होता. तात्काळ त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे नेण्यात आले. तपासणी केली असता डॉक्टराणी मृत्यू घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार हाजी अली सरवर शेख हे साई दरबार या हॉटेलमध्ये जेवण करत असताना पाच ते सहा अज्ञात आरोपी सशस्त्र सह आले व त्यांनी अंधातून गोळीबार केला यामध्ये हाजी अली यांच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

हाजी अली सरवर शेख हा घुग्गुस येथील कुख्यात गुन्हेगारी जगतातील नामी असल्याचे बोलल्या जात आहे.

चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून गोळीबारीच्या घटनामध्ये वाढ होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.