आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️संघटनेचे बळ समाज प्रगतीचे द्योतक – प्राचार्य पालीवाल

▪️पालीवाल पंचायत तर्फे नारीशक्ती सन्मान समारोह..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

चोपडा – ( इंडिया 24 न्यूज ) :
कोणत्याही समाजाची प्रगती ही त्याच्या समाजातील आचार,विचार,व संस्कारासह त्यांच्या समाज संघटन शक्तिबलावर अवलंबून असल्याने संघटन शक्ती हेच समाज प्रगतीचे द्योतक असल्याचं प्रतिपादन सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ प्राचार्य के. सी. पालीवाल यांनी चोपडा पालीवाल पंचायत तर्फे आयोजित नारी शक्ती सन्मान प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलतांना केले.
शहरातील आनंदराज पॅलेस मध्ये आयोजित या कार्यक्रमात बारा ज्येष्ठ मातृशक्तीचा सन्मानपत्र, साडी आहेर,तुळशीमाळ,व गीतासार प्रदान करून सौ.शशिकला पालीवाल,व स्थानिक महिला मंडळ सदस्यांचे हस्ते करण्यात आला.

त्यात श्रीमती उमाबाई पालीवाल,श्रीमती कमलाबाई पालीवाल, श्रीमती जसोदाबाई पालीवाल,श्रीमती विजयाताईपालीवाल, श्रीमती सुनीता पालीवाल,श्रीमती कमलबाई पालीवाल, श्रीमती प्रमिलाबाई पालीवाल,श्रीमती कोकिळा मगणलाल पालीवाल,श्रीमती प्रेमाबाई पालीवाल, श्रीमती भिकुबाई पालीवाल, यांना सन्मानित करण्यात आले.
*मान्यवरांचा सत्कार*
याप्रसंगी ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये कत्थक नृत्य मध्ये समाविष्ट पालीवाल समाजातील कु. सौम्या विजय पालीवाल, कु.भाव्या हेमंत पालीवाल,(मंदसौर) कु. अनन्या पालीवाल, कु. मोक्षदा कानुनगो, कु. सानवी मंडलोई (सेंधवा)यांना स्मृतिचिन्ह,पुष्प गुच्छ व भेट वस्तू देऊन अध्यक्षांच्या हस्ते गौरविण्यात आले. ॲड.सतीश पालीवाल यांची भारत सरकारने नोटरी पदी नियुक्ती केल्याबद्दल प्रा.पालीवाल यांच्याहस्ते तसेच समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.भालचंद्र चूनिलाल पालीवाल यांना जीवन गौरव पुरस्काराने चोपडा पालीवाल समाजातर्फे सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. गिरीश कानुनगो यांनी आपल्या मनोगतात चोपडा पालीवाल समाजाची वाटचाल दैदिप्यमान पणे सुरू असून भविष्यातही समाजाचा नावलौकिक अधिकाधिक वाढत राहो, अश्या शब्दात शुभेच्छा दिल्यात.
कार्यक्रम शुभारंभ मां आशापूर्णा प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आला.पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष प्रदीप पालीवाल,सचिव डॉ. विशाल पालीवाल,उपाध्यक्ष गिरीश पालीवाल, नागेंद्र पालीवाल,कोषाध्यक्ष राजेंद्र पालीवाल, यांनी केले.प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाराष्ट्र पालीवाल परिषदेचे महामंत्री अनिलकुमार पालीवाल,व सौ. रुपाली विशाल पालीवाल यांनी केले . याप्रसंगी सोयत महिला मंडळाच्या सक्रिय कार्यकर्त्या सौ. राजश्री पालीवाल, यांचं स्वागत सौ. किरण पालीवाल यांनी केले.कार्यक्रमात फाग उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. निर्मल टाटीया यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास माजी नगरसेवक चंदुलाल पालीवाल, सुरेश पालीवाल,हरिओम पालीवाल खंडवा,विकास पालीवाल, ओमप्रकाश पालीवाल,दिलीप पालीवाल, दीपक पालीवाल लासूर, जितेंद्र पालीवाल चौगाव, दमयंती पालीवाल, आदी शेकडो समाज बांधव, महिला मंडळ,व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री महेश पालीवाल,अशोक पालीवाल, संदीप पालीवाल, सौ. रुपाली पालीवाल, सौ.किरण पालीवाल, सौ. सीमा पालीवाल, आदींनी परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.