आपला जिल्हाताज्या घडामोडी

▪️चंद्रपुर समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम व शिक्षणाधिकारी निखीता ठाकरे यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करा..

▪️राष्ट्रीय समाज पक्ष जिला अध्यक्ष रमाकांत यादवनी चंद्रपूर जिल्हाअधिकारी यांना दिले निवेदन..

मुख्य संपादक तथा संचालक श्री. तुळशीराम जांभूळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) : निवासी मूक बधीर विद्यालय, चंद्रपूर या शाळेवर बदलापूर सारखी घटना होण्यापुर्वी १० दिवसांच्या आत दोषींची चौकशी करून शाळेवर प्रशासक नेमण्यात यावा व समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम व शिक्षणाधिकारी निखीता ठाकरे यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल। चंद्रपूर शहरात निवासी मूक बधीर विद्यालय आहे. यात संस्था अध्यक्ष अनंत लहामगे, संस्था सचिव जयेश वऱ्हाडे, मुख्याध्यापक कालिदास बलकी व वसतिगृह अधीक्षक अजय वैरागडे यांनी चार महिन्यांपूर्वी मुक, बधिर विद्यार्थीनीला छेडण्याचा प्रकार समोर आला होता. या विरोधात २९ जुलै २०२४ व १ ऑगस्ट २०२४ रोजी तक्रार करण्यात आली होती. तक्रारीची चौकशी करून दोषीवर कारवाई करून शाळेवर प्रशासक नेमण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली होती. आज या प्रकरणाला चार महिने उलटून सुद्धा प्रशासनाकडून शाळेवर कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या दिरंगाई मुळे व आरोपींच्या राजकीय प्रभावामुळे अश्या घटना घडूनही आरोपी परत शाळेवर रुजू होत आहेत. सदर विद्यालय हे समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत चालविल्या जाते. या प्रकरणात समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांची वेळोवेळी भेट घेतली, निवेदन दिली पण संस्थेवर कुठलीच कारवाई झालेली नाही. त्वरित उपरोक्त गंभीर प्रकरणाची दखल घेऊन दोषीवर योग्य कारवाई करण्यात यावी व शाळेवर प्रशासक नेमण्यात यावा अन्यथा बदलापुर सारखा लांछनिय प्रकार या शाळेमध्ये होऊ शकतो. त्वरित निवेदनाची त्वरित दखल घेण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, याला जि.प. प्रशासन व जिल्हा प्रशासन जबाबदार राहील।

जिला परिषद अधिकारी शाळेवर कुठलीच कारवाई कां करीत नाहीत, असा प्रश्न उभा राहतो. सामान्य शाळेत देखील दिव्यांगांसाठी रम असलेच पाहिजे असा कायदा आहे. मग ह्या मूक बधीर विद्यालयाला हा कायदा लागू होत नाही का? येथील समाज कल्याण अधीकारी शाळेला भेट देतात तेंव्हा त्यांना या त्रुटी दिसत नाहीत का ? या मूक बधीर शाळेच्या स्थापनेपासून म्हणजेच ४० वर्षापासून मुलींच्या वसतिगृहाला महिला अधीक्षक नाही. हि बाब समाज कल्याण अधिकाऱ्यांना माहित असुन व समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम हे वेळोवेळी शाळेला भेटी देत असतात परंतु या नियमबाह्य शाळेवर कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. ही बाब गंभीर आहे. मूक बधीर शाळेतील आरोपी कर्मचारी यांचा निलंबन कालावधी वाढविण्यात कां आला नाही ? एकंदरीत ह्या सर्व प्रकरणावरून असे वाटायला लागले कि समाज कल्याण अधिकारी आणि मूक बधीर शैक्षणिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचे काही साटेलोटे आहे का ?

निवासी मूक बधीर विद्यालयातील सर्व दिव्यांग मुलीनी संस्था सचिव व मुख्याध्यापक यांचेकडे माहे ऑक्टोबर २०२३ मध्येच आरोपीची तक्रार केली. आरोपी विद्यार्थीनींचे शोषण करतात याची माहिती असुन ही समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करतात. समाज कल्याण अधिकार सुरेश पेंदाम यांची ही चौकशी होऊन त्यांचेवर देखील फौजदारी कारवाई करण्यात यावी.

लैंगिक शोषणाचा प्रकार या शाळेत आताच घडला कि याही आधीपासून हे सारे घडत आलेले आहे ? अश्या अनेक प्रश्नाची उकल झालेली नाही.
वरील गंभीर प्रकरणाची १० दिवसांच्या आत चौकशी करून निवासी मूक बधीर विद्यालय, चंद्रपूर या शाळेवर बदलापूर सारखी घटना होण्यापुर्वी दोषींची चौकशी करून शाळेवर प्रशासक नेमण्यात यावा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रमाकांत यादव दिली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.