आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️शिवनी येथे बैलजोडी सजावट स्पर्धा संपन्न..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर : ( इंडिया 24 न्यूज ) : पोळा हा सण सर्जा राजाच्या सन्मानाचा दिवस ज्याच्या जीवावर शेतकरी राजा हा अभिमानाने डोलतो हा सण केवळ शेतकऱ्याचा नसून सर्वसामान्य जनतेचा सण आहे. बैलाच्या मेहनतीमुळे सर्वसामान्य जनतेच्या ताटात अन्न पुरविल्या जाते अशा या सर्जा राजाची शिवनी येथे बैल जोडी सजावट स्पर्धा भव्य दिव्य प्रमाणात घेण्यात आली. या स्पर्धेत 100 पेक्षा जास्त बैल जोड्यांनी सजून धजून सहभाग नोंदविला या स्पर्धेत निरीक्षणाचे काम डॉ नंदकिशोर मैंदळकर व सुदर्शन नैताम यांनी बघितले. एकापेक्षा एक अशा सरस बैल जोड्या उत्कृष्ट सजावट करून उतरल्यामुळे स्पर्धेत अतिशय चुरस निर्माण झालेली दिसली. यात उत्कृष्ट सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक वसंता पाहानपटे यांना फवारणी पंप, द्वितीय क्रमांक आनंदराव लोनगाडगे झटका मशीन, तृतीय क्रमांक बाळकृष्ण भोयर यांना ताडपत्री देण्यात आली तसेच नैसर्गिक रंग सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक घनश्याम पहानपटे झूल, द्वितीय क्रमांक वारलू पिंपळशेंडे यांना झूल देण्यात आली. या कार्यक्रमात गणेश भोयर पोलीस पाटील, रवींद्र पहानपटे सरपंच, डॉक्टर सुधीर पटेल, चंद्रकांत पहानपटे, शंकर लोणगाडगे ग्राम. पं सदस्य, देवराव पहानपटे, वामन लोनगाडगे, मधुकर पहानपटे, बाबुराव बुरान, विकास लोनगाडगे, सुनील भोयर, भाऊजी धारणे, धनराज ठाकरे, डॉ आदित्य तिवारी, डॉ सुनील पद्मावार, सत्यशीला भोयर, अमोल रोडे, सारिका घाडगे, दशरथ पहानपटे, सारिका बुरांन, अमोल खैरे, साईनाथ भोयर आदींनी अथक परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.