आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️वरोरा विधानसभेत स्थायी बदल घडविण्यासाठीच आम्हि मैदानात.- डाॅ.चेतन खुटेमाटे

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

वरोरा – ( इंडिया 24 न्यूज ) : चला बदल घडवुया या उपक्रमा अंर्तगत डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतु टेमुर्डा येथे दिनांक ८ सप्टेंबर २०२४ ला मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन टेमुर्डा,मांगली, जामणी, आसाळा, बेलगाव,आटमुर्डी,पिजदुरा,पिंपळगाव,बांद्रा व परीसरातील १३४२ नागरीकांनी लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे उदघाटन जर्नादन पा.देठे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.चेतन खुटेमाटे होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुचिता ठाकरे, विलास झिले डाॅ.अमित झिले राजु तिखट,प्रकाश विरुटकर,लहू ठक,सुनिता आत्राम,वैशाली दरेकर,निलीमा इंगोले,ताराचंद खिरटकर,पुष्पाकर खेवले,माणिक बोबडे,पावडे सर हे मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षिय मनोगत व्यक्त करतांना वरोरा विधानसभा क्षेत्रातील शेती,शेतकरी,शेतमजुर,विद्यार्थी,युवक युवतींसाठी भरीव व स्थायी काम करण्यासाठी मि वरोरा विधानसभा क्षेत्राची निवडणुक लढून क्षेत्रातिल आर्थिक,शैक्षणिक,बेरोजगारी व शेतकर्‍यांच्या विविध समस्यांवर प्राधान्याने काम करुण स्थायी बदल घडविण्यासाठी विधानसभेची निवडणुक पुर्ण ताकदीने लढण्याची घोषणा करत चला बदल घडवुया अंर्तगत सुरु असलेले उपक्रम सतत सुरु राहील अशी ग्वाही दिली.या कार्यक्रमाचे
प्रास्ताविक कामेश कुरेकार, संचालन चंद्रशेखर झाडे,आभार प्रदर्शन अनुप खुटेमाटे यांनी केले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गुरुदृष्टी नेत्रालय ची सर्व टिम बोधी दारुंडे,आतिश तुमसरे,पवन बावणे,समिर झाडे,समिर जाधव,सुरज वाकडे,कुणाल तुमसरे,शुभम सोनुने,मोहीत कुंडलकर,सागर दोहतरे,प्रविण वासेकर, सावित्री बाई फुले कन्या विद्यालयाचे कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.