महाराष्ट्रआपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेश

▪️मूल बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भावी आमदार म्हणून लोकांच्या नजरेत संतोषसिंह रावत

 

*डॉ. आनंदराव कुळे
*मूल तालुका प्रतिनिधी
*मोब. क्र. 9403179727

मूल – (इंडिया 24न्यूज ) : आगामी होऊ घातलेल्या राज्य विधानसभेच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाकरिता भावी आमदार म्हणून श्री. संतोषसिंह रावत यांचे कडे आशेने बघत आहे. गोरगरिबांच्या कल्याणासाठी झटणारे, अडचणीचे वेळी लोकांच्या मदतीला धावून जाणारे दानसूर व्यक्तिमत्वाचे धनी असलेले यांचेकडे या क्षेत्रातील मतदार भावी आमदार म्हणून पाहत आहे.विर बजरंगबलीचे निस्सीम भक्त असलेले श्री. रावत भाऊ हे राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक, शैक्षणिक, सहकार, क्रीडा, धार्मिक इत्यादी क्षेत्रात अनेक लोकोपयोगी सेवेचे उपक्रम राबवून जनतेची सेवा करण्यात तत्पर असतात. त्यांनी कोरोना काळात तीन महिने विनामूल्य अन्नपूर्णा थाळी उपक्रम राबविला. त्याकाळात गरजवंतांना औषधोपचार व रुग्णवाहीकेची सेवा दिली. युवकांच्या शारीरिक विकासासाठी युवाशक्तीच्या माध्यमातून कुस्ती, कबड्डी, क्रिकेट आदी स्पर्धाचें आयोजन ते करीत असतात. जिल्हा मध्यवार्ती सहकारी बँक च्या माध्यमातून दुर्धर रुग्णांना औषधोपचाराकरिता आर्थिक सहकार्य करीत असतात व गरजवंत शेकडो भगिनींना सहकार्याचा हात देत असतात. त्यांनी राजीव गांधी स्वावलंबन योजनेमधून अनेकांना रोजगाराच्या संधी मिळवून दिली आहे. जिल्हा परिषद चंद्रपूर च्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात अनेकांना योजनांचा लाभ मिळवून दिला. लाभार्थ्यांना लाभ मिळवून देतेवेळी कोणत्याही प्रकारचा दुजाभाव केलेला नाही.ते जनसेवा हीच ईश्वरसेवा मानुन आजातागायत लोकांच्या सेवेत क्रियाशील आहेत.
संतोषसिंह रावत यांनी आजवरच्या जीवनप्रवासात मुलचे नगराध्यक्ष्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती,जिल्हा परिषद चंद्रपूर चे अध्यक्ष इ. पदे सांभाळलीत. सध्या ते चं. जिं. मध्य. सह. बँक चंद्रपूर चे अध्यक्ष आहेत.
अश्या दिलदार, दमदार, दानशूर व जनतेमध्ये राहून समाजाप्रती बांधिलकी जोपसणाऱ्या संतोषसिंह रावत यांचेकडे या क्षेत्रातील जनता बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भावी आमदार म्हणून पाहात आहे. त्यांना आमदार म्हणून निवडून आणण्याचा चंग बांधलेला प्रत्येकात दिसतोय.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.