आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

‘गुन्हेगारांना संरक्षण देणारे राज्याचे गृहखाते‘..

*🔻श्री. अरविंद चहांदे*

*🔻चंद्रपूर तालुका उप प्रतिनिधी*

*🔻मो. नं. 9405714165*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) : पूर्वी गुन्हा घडला की आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी चौकशी व्हायच्या. महायुती सरकारच्या काळात बदल झाला आहे.
आधी पोलिसांना बघावं लागतं, की गुन्हेगार महायुती सरकार मधील मंत्री, त्याच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा मंत्र्यांना पैसे पुरवणारा धनदांडगा तर नाही ना?!यापैकी कोणी असेल तर आधी त्याला वाचवून त्यांच्या ड्रायव्हर, काम करणारा कर्मचारी किंवा मित्र म्हणून कार्यकर्त्यांच्या नावावर गुन्हे दाखल केले जातात.
महायुती सरकारच्या काळात गृहखात्याने बनवलेला हा पॅटर्न काल पुन्हा चालला तो भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलासाठी.

नागपूर मध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या मुलाने भरधाव वेगात गाडी चालवल्यामुळे अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गाडी मुलगा चालवत होता, मुलाच्या नावावर गाडी आहे इतकं सर्व स्पष्ट असूनही पोलिसांनी बावनकुळे यांच्या मुलाला सोडून दुसऱ्याच्या नावावर गुन्हा दाखल केला.

ज्याच्या नावावर गाडी आहे, जो गाडी चालवत होता त्याच्या नावावर गुन्हा दाखल होत नाही ?

पुण्याच्या पोर्शे प्रकरणात दोन निष्पाप युवक युवतीचे जीव गेले होते. त्या घटनेचा गृहमंत्री आणि गृहविभागाला कोणताही पश्चाताप झाला नाही. आता परत नागपूर पोलिसांचे वागणे स्पष्ट दाखवते या राज्यात पोलिस हे गुन्हेगारांना लपविण्यासाठी, वाचवण्यासाठी काम करते, न्यायासाठी नाही!

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.