आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासंदर्भात अनेक मागण्यासहित ग्रामस्थांनी सादर केले निवेदन..

 

*डॉ. आनंदराव हरी कुळे
*मूल तालुका प्रतिनिधी
*मो. क्र. 9403179727

मूल – (इंडिया 24न्यूज ) : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे व जि. मध्य. सह. बँक चे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वाखाली तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक श्री. जितेंद्र रामगावकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये दहशत पसरविणाऱ्या नरभक्षक वाघांचा तातडीने बंदोबस्त करावा, गुरे चरण्यासाठी चराई क्षेत्र निर्माण करण्यात यावे तसेच वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीला वन विभागात नोकरी देण्यात यावी. अश्या मागण्यांसाठी निवेदन सादर केले.
संतोषसिंह रावत यांनी मागण्या पूर्ण न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा दिला.
मुख्य वनसंरक्षक रामगावकर यांनी आठवडाभरात नरभक्षक वाघाच्या बंदोबस्तासाठी पावले उचलण्याचे आश्वासन दिले. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची ग्वाही दिली.
यावेळी आणखी काही महत्वाच्या मागण्यावरही चर्चा झाली. या मागण्यांमध्ये जंगलात गुरे चारणाऱ्या गुरख्यांना टॉर्च वाटप करणे, वन विभाग आणि ग्रामस्थ यांचेमध्ये समन्वय साधण्यासाठी समन्वयकांची नियुक्ती करणे, व वाघांच्या हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी जाळीचे कुंपण उभारणे यांचा समवेश होता.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.