आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️गळफास घेऊन इसमाची आत्महत्या :मूल तालुक्यातील घटना..

 

*डॉ. आनंदराव हरी कुळे
*मूल तालुका प्रतिनिधी
*मो. क्र. 9403179727

मूल – ( इंडिया 24 न्यूज ) : मूल तालुक्यातील चितेगांव येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
मृतक राहुल मंदावर हा डब्लू सी. एल. दुर्गापूर येथे कार्यरत होता. काही दिवसापासून तो त्याच्या आजोबा कडे राहत होता. आजी व आजोबा हे बाहेर गावी गेले होते. राहुल हा एकटाच होता. घरी नसल्याची संधी बघून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुली आहेत.
घटनेची माहिती होताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. लगेच ही माहिती मूल पोलिसांना दिली. घटनास्थळी मूल पोलीस दाखल होऊन पुढील तपास करीत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.