आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघामुळे छोट्या वृत्तपत्रांना शासकीय जाहिरातीची सुरूवात..

▪️मोठी लाडकी आणि छोटी सावत्र का? या लेखाला छोट्या वृत्तपत्रांनी दिला व्यापक प्रतिसाद..!

 

*🔸सौ शिल्पा बनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

अकोला – ( इंडिया 24 न्यूज ) : शासनाच्या योजनांचा वृत्तसेवेतून तळागाळात प्रसार करण्यात महत्वपूर्ण भुमिका बजावणाऱ्या छोट्या वृत्तपत्रांना लाडकी बहिण योजना आणि विशेष प्रसिध्दी मोहिमांच्या जाहिराती देण्यात याव्यात,अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून दि.२० ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेली होती. त्यानंतर मुख्यमंत्री योजनादुत या जाहिरातीपासून “क” वर्ग छोट्या व साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिराती देण्यास शासनाकडून सुरूवात झालेली आहे.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मागणीचे हे यश असून पत्रकार हक्क आणि कल्याण योजनांमधील अडचणींसाठी सुध्दा संघटना शासनाच्या सतत संपर्कात असून यातील बदल होण्यास सुध्दा सुरूवात होणार आहे.

शासनाला मोठी वृत्तपत्रे लाडकी आणि छोटी सावत्र आहेत का? असा प्रश्न लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी त्यांच्या विश्वप्रभात वृत्तपत्रातील संपादकील लेखामधून शासनाला विचारला होता.जाहिरात वितरणातून छोट्या वृत्तपत्रांवर सतत होणारा अन्याय दुर न झाल्यास राज्यभरातील संपादक- प्रकाशकांकडून आंदोलनाचा आक्रमक पावित्रा घेण्याची भुमिका सुध्दा स्पष्ट केली होती. जाहिरात वितरणाबाबतीत असलेल्या “लाडकी आणि सावत्र” या लेखाला अनेक छोट्या वृत्तपत्रांनी सुध्दा प्रकाशित करून भरभरून प्रतिसाद दिला होता.छोट्या वृत्तपत्रांच्या अनेक समस्यांबाबत संजय देशमुख यांनी दि.२२ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे अॕडीशनल प्रेस जनरल व डायरेक्टर जनरल श्री राजीव कुमार जैन यांची भेट घेऊन समक्ष चर्चा केली.यामध्ये महाराष्ट्रातील छोट्या संपादक,प्रकाशकांचे फोन न उचलण्यापासून तर पोर्टलमधील अडचणी व नियमित रिटर्न भरणारांकडून चुकीच्या पध्दतीने वसुल झालेल्या दंडाबाबत माहिती दिली.दिल्ली कार्यालयाकडून सुलभ सेवा आणि समाधानकारक माहिती मिळावी आणि चुकीच्या पध्दतीने वसूल केलेल्या दंडाच्या रकमा तपासणी करून संबंधितांना परत कराव्यात अशी मागणी सुध्दा प्रत्यक्ष चर्चेत आणि दिलेल्या लेखी पत्रातून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून करण्यात आलेली आहे.
राज्य आणि केन्द्राकडील मागण्यांसाठी स्थापनेनंतरच्या गेल्या साडेतीन वर्षापासून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ सतत सक्रिय असून अनेक वेळा संघटनेच्या मागणीनंतरच जाहिराती सुरू झालेल्या आहेत.त्याचप्रमाणे आता राज्य सरकारकडून सुध्दा “मुख्यमंत्री योजनादुत” जाहिरातीपासून सुरूवात म्हणजे संघटनेच्या मागणीला मिळालेले यश आहे.अशी माहिती लोकस्वातंत्र्यचे केन्द्रीय उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार प्रदिप खाडे,किशोर मानकर ,राष्ट्रीय सचिव राजेन्द्र देशमुख,पुष्पराज गावंडे,प्रा.डॉ.संतोष हुशे,भगिरथ बद्दर,अॕड एन.जी सुर्यवंशी,अरविंद देशमुख,मंत्रालय समन्वयक व प्रदेश संघटक रफिक मुलाणी,मोहन शेळके, सागर लोडम,मनोहर मोहोड व पदाधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेतून मिळाली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.