ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️भद्रावती तहसीलदारांची बदली करन्यासाठी व ईतर मागणी पुर्ती साठी विरुगिरी आंदोलन..

 

*♦️राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक*

भद्रावती – ( इंडिया 24 न्यूज ) : भद्रावती येथील डोलारा तलाव झोपडपट्टी येथे अतिवृष्टीमुळे या भागातील अनेक घरांमध्ये तलावातील पाणी घरात शिरल्यामुळे घरातील वस्तूंचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,त्याकरिता प्रशासनाला वारंवार सांगून सुध्दा प्रशासन याकडे गांभीर्याने दखल घेत नाही आहे म्हणून येथील रहिवासी राहुल सोनटक्के यांनी विरुगिरी पद्धतीने बी एस एन एल च्या टॉवरवर चढून आंदोलन केले.
राहुल सोनटक्के यांची प्रमुख मागणी आहे की तलावाचे खोलीकरण करून संरक्षण भिंत उभी करणे आणि भद्रावती शहरातील गरीब विरोधी तहसीलदार श्री.अनिकेत सोनावणे साहेब यांची तत्काळ बदली करणे,कारण त्यांना वेळोवेळी निवेदन देऊन ते त्या निवेदनावर अंमल करीत नाही. या अगोदर प्रशासनाने आश्वासन दिले होते की तलावाचे पाणी काढण्याकरीता एम्टा या कंपनीतून मोटार पंप आणून लावणार आणि डिझल चा बंदोबस्त करून देणार परंतु १,२ दिवसच डीझल देण्यात आले.
प्रशासनाला वारंवार सांगून सुध्दा प्रशासन याकडे गांभीर्याने दखल घेत नाही आहे म्हणून येथील रहिवासी राहुल सोनटक्के यांनी सकाळी ५.३० वा. टॉवर चढून आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्याकरिता विरुगीरी पद्धतीने आंदोलन केले.या आंदोलनाची दखल घेत उपविभागीय पोलिस अधिकारी आयूष नोपानी साहेब,मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर साहेब आणि नगर अध्यक्ष अनीलभाऊ धानोरकर यांनी घटनास्थळी येऊन भेट दिली.आंदोलन कर्त्याची समस्या जाणून घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर समस्याचे निवारण करण्यात येईल असे आश्वासन दिले.
आश्वासन मिळाल्या नंतर राहुल सोनटक्के यांनी ११.०० वा.आपले आंदोलन मागे ha घेतले.आंदोलन कर्त्याच्या समर्थनार्थ डोलारा तलाव येथील जवळपास ३०० ते ४०० झोपडपट्टीवसियांनी समर्थन दिले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.