आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️तालुक्यातील आरोग्य यंत्रणाच सलाईनवर..

▪️तालुक्याचा भार प्रभारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यावर..

♦️राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक*

सावली – ( इंडिया 24 न्यूज ) – सावली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणाच सलाईनवर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुका आरोग्य अधिकारी प्रभारी असल्याने कर्मचाऱ्यावर वचक नसल्याचे बोलले जात आहे.
आरोग्य सेवा सुरळीत राहून रुग्णांना आरोग्य विषयी अडचण निर्माण होणार नाही. म्हणून शासन आरोग्य यंत्रणेवर लाखो रुपये खर्च करते. ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहचावी या हेतूने शासनाने प्राथमिक आरोग्य स्वास्थ्य केंद्राची निर्मिती केलेली आहे. सावली तालुक्यात एकुन 6 आरोग्य केंद्र व 1 ग्रामीण रुग्णालय आरोग्य सेवे करीता आहे. तालुक्यातील आरोग्य केंद्रामध्ये एम बी बी एस वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केल्या गेली आहे. परंतु ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याची बाब लक्षात आली आहे.प्रा आरोग्य केंद्र जिबगांव येथे काही कर्मचारी यांचे रिक्त पदे आहेत तर कर्मचारी सुध्दा मुख्यालय राहत नसल्यामुळे साध्या आजाराला रेफर करीत असल्याची ओरड नागरिकांमध्ये होत आहे. काही प्राथमिक स्वास्थ केंद्रात वैद्यकीय अधिकारी हे मुख्यालयी राहत नसल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील आरोग्य सेवा ही कोलमडली असल्याचे निदर्शनास दिसुन येते आहे.
तालुक्यातील जिबगांव, परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत मात्र रात्रीच्या वेळेस अधिकारी कर्मचारी हजर राहत नसल्याचे बोलले जात आहे. वेळेवर उपचार न झाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही या परिसरात घडलेल्या आहेत. तर रुग्णांना योग्य मीळत नसल्याचे बोलले जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्याबाबत संबंधित विभाग उदासीन असल्याचे निदर्शनास येत आहे. अनेक रुग्णांना सावली किंवा गडचिरोली येथे रेफर केल्या जात असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. अशा गंभीर बाबीकडे संबंधित विभागाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित करून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुरळीत करावी अशी मागणी ग्रामीण भागातून केल्या जात आहे.

कोट –
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी मुख्यालय उपस्थित राहत नसल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे. रुग्णांचा उपचार न करताच रेफर केल्या जात असून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. आरोग्य अधिकारी व प्रभारी तालुका अधिकारी यांना वेळोवेळी माहीती पुरवण्यात येत असुन याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते आहेत लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष केंद्रित करून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुरळीत करावी.

राकेश एम गोलेपल्लीवार ग्रामपंचायत सदस्य जिबगांव

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.