ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️स्वस्तिक पॅटर्न नुसार वृक्षरोपण होणारे शिवाजी विद्यालय निंबा हे महाराष्ट्रातील पहिले असल्याचा अभिमान – श्री. सौरभ कटीयार (मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. अकोला)

▪️निंबा येथील आरोग्य केंद्र व शिवाजी विद्यालयात श्रीधरपर्व निमित्य १००० वृक्षांचे रोपण..

 

*♦️राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक*

▪️वृक्षमित्र ए. एस. नाथन यांची स्वतिक वृक्षारोपण संकल्पना..

अकोला दि.२५:- निंबा परिसरातील शैक्षणिक, सामाजिक, ग्रामीण विकास आणि विविध क्षेत्रातील दैदिप्यमान कार्याने कर्मयोगी ठरलेल्या स्व. श्रीधराव देशमुख उपाख्य ‘मालक’ यांचा जन्म शताब्दी महोत्सव श्रीधर पर्वातिल नियोजित कार्यक्रमात एक हजार वृक्षारोपणाचा कार्यक्रम दि. २४ ऑगस्ट २०२२ रोजी पार पडला.

श्री. शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, निंबा व आरोग्य केंद्र, निंबा यथे वृक्ष रोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. आरोग्य केंद्रात “यु” च्या आकारात तर श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ऑक्सिजन मॅन म्हणून प्रसिद्ध असणारे श्री. ए. एस. नाथन यांच्या “स्वस्तिक” आकारा मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. दोन्ही ठिकाणी मिळून १००० वृक्षांचे रोपण करण्यात आले.

श्री. ए. एस. नाथन यांच्या स्वस्तिक पॅटर्न नुसार वृक्षरोपण होणारी महाराष्ट्रातील ही पहिली शाळा आहे, जिल्ह्यासाठी तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे जि. प. अकोलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सौरभ कटीयार यांनी व्यक्त केले तसेच कठीण परिश्रमाशिवाय इच्छित ध्येय प्राप्त होऊ शकत नाही. वय व वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यात काही अर्थ नसतो. विद्यार्थ्यांनी ह्याच वयात ध्येय निश्चीत करुन शर्थीने अभ्यास करावा. उच्च शिक्षण प्राप्त करुन राष्ट्रसेवा करावी, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाची राष्ट्रीय सेवा करण्याची संधी तुम्हाला आज स्व. श्रीधररावजी देशमुख शतक महोत्सवी वर्षानिमित्त्य आयतिच चालून आली आहे. ह्या संधीचे सोने करुन पुढील आयुष्यासाठी जिद्द व चिकाटीची मुहूर्तमेढ आजच रोवुन, आज लावलेली ही हजार झाडे जगवून स्व. श्रीधररावजी देशमुखांना खरिखुरी श्रद्धांजली अर्पण करा असे कळकळीचे आवाहन मा. सौरभ कटीयार यांनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना केले.

कार्यक्रमाच्या अगोदरच्या दिवशी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांना वृक्षरोपणाचे महत्व सांगून श्री. ए. एस. नाथन यांनी पूर्णतः विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून महाविद्यालयातील वृक्षरोपण केले हे विशेष.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, निंबाचे प्राचार्य श्री. दिवाकर वानखडे तर उद्घाटक म्हणून अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. सौरभ कटियार, तसेच प्रमुख उपस्तीतांमध्ये वृक्ष क्रांती मिशनचे संस्थापक अध्यक्ष तथा ऑक्सिजन मॅन म्हणून ओळखले जाणारे मा. श्री. ए. एस. नाथन, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी अकोला मा. श्री डॉ. वसंत पवार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. हर्षवर्धन देशमुख, बाळापूरचे गटविकास अधिकारी मा. श्री. मिलिंद मोरे, विस्तार अधिकारी श्री. नाना पजई, आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षाली ताडे तसेच सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निंबा गावच्या सरपंचा सौ. ज्योतीताई सोनोने, उपसरपंचा सौ. अंजलीताई तायाडे, ग्रामसेवक श्री. रितेश भराडे, पटवारी श्री. अविनाश राऊत व समस्त ग्रामपंचायत सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षिका सौ. बाळसारफ तर आभार प्रदर्शन श्री भास्कर खंडारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वतीतेसाठी आयोजन समिती सदस्य श्री. गजाननराव भारसाकळे, डॉ. मंदार देशमुख, प्रसंजीत देशमुख तसेच विद्यालयाचे, आरोग्य केंद्राचे व ग्रामपंचायत निंबाच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाला परिसरातील नागरिक व विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

*ए. एस. नाथन यांना ऑक्सिजन मॅन म्हणून का संबोधले जातात?*
श्री. नाथन हे वृक्ष प्रेमी आहेत. यांचे ८ हजार करोड वृक्ष लावण्याचे ध्येय आहे. यांनी आता पर्यंत ४० लाख झाडी लावली तसेच अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वस्तिक पॅटर्न (O4U) मध्ये लाखोंच्या वर वृक्ष लागवड केली. श्री. ए. एस. नाथन यांचे स्वस्तिक नावचे पॅटर्न प्रसिद्ध आहे. यात स्वस्तिक च्या आकार मधे झाडी लावण्यात येतात.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.