आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

*विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक*, *पत्नी व पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार*

 

 

जिल्हा प्रतिनिधी -: अरुण माधेशवार.

चंद्रपूर, दि.29 ऑगस्ट : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/ विधवा पत्नी/पाल्य यांना विविध क्षेत्रात केलेल्या अति उत्कृष्ट कामगिरीबदद्ल एकरकमी 10 हजार आणि 25 हजार रूपयांचा विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार असून यासाठी 15 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.सन 2021-22 या वर्षासाठी माहे ऑक्टोबर 2022 मध्ये विशेष गौरव पुरस्कार समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत सैनिक कल्याण विभागामार्फत प्राप्त प्रकरणांची छाननी करून विशेष गौरव पुरस्कार मंजूर करण्यात येईल.
नागपूर मंडळाच्या इयत्ता 10 वी व 12 वीच्या परीक्षेत 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या पाच माजी सैनिक/ विधवा यांच्या पाल्यांना एकरकमी रु. 10 हजार विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल. केंद्रीय शिक्षण बोर्ड, नवी दिल्ली येथून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याच्या ग्रेड शीट निष्पादन प्रमाणपत्रांमध्ये प्राप्त गुण व टक्केवारी दर्शविण्यात येत नाही. तरी सदर प्रकरणासोबत संबंधित विद्यालयाचे गुणपत्रक टक्केवारी सह जोडण्यात यावे. पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक/ पत्नी व पाल्य यांना एकरकमी रु. 10 हजार विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल. त्यासोबतच आय.आय.टी, आय.आय.एम व एम्स अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक/ विधवा यांच्या पाल्यांना रु. 25 हजार विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल.
तरी,चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवांनी विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठी आपले प्रकरण जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय चंद्रपूर येथे दि. 15 सप्टेंबर 2022 पर्यंत सादर करावे. त्यानंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.