आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अग्निवीर निवड प्रक्रिया मानकापूर क्रीडा संकुलात पार पाडणार

🔸कृपया विदर्भातील सर्व जिल्हयांसाठी आवश्यक वृत्त 

मुख्य संपादक -: श्री. तुळशीराम जांभुळकर.

नागपूर दि. २९ : भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच नोंदणी झालेल्या पुरुष उमेदवारांसाठी 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा निहाय निवड प्रक्रिया आता मानकापूर क्रीडा संकुल येथे पार पडणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी आज येथे दिली.
‘अग्निवीर ‘ अर्थात सैन्य भरती नोंदणी करण्यासाठी दिलेल्या कालावधीमध्ये विदर्भातील दहा जिल्ह्यांमधून 59 हजार 911 उमेदवारांची नोंदणी झाली आहे. नोंदणी झालेल्या उमेदवारांचीच निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
त्यासाठी आवश्यक असणाऱ्या शारीरिक स्पर्धा व अन्य बाबींसाठी नागपूर शहरातील मानकापूर क्रीडा संकुल हे योग्य स्थळ असून याच ठिकाणी ही प्रक्रिया पार पडली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा व अन्य व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना आज त्यांनी प्रत्यक्ष पाहणी दरम्यान दिल्या.
मानकापूर जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी आज दिलेल्या भेटीदरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, सैन्य भरती कार्यालय नागपूरचे संचालक कर्नल जगतनारायण, क्रीडा व युवक सेवा नागपूर विभागाचे विभागीय उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.