आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️लाखांदूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार..

▪️सीटी 1 वाघाची 13 वी शिकार , आठ दिवसात दुसरा बळी ..

संपादक – सौ. शिल्पा बनपूरकर

लाखांदूर – ( इंडिया 24 न्यूज ) : आठवडाभरापूर्वी इंदोरा जंगलात मासेमारीसाठी गेलेल्या इसमाचा बळी घेणाऱ्या सीटी -1 वाघाने आज पुन्हा एका शेतकऱ्याचा बळी घेतला . शेतातील पिकाची पाहणी कराण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले . घटना शुक्रवार 30 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगाव शेतशिवारात घडली . या वाघाची ही 13 वी शिकार असून तालुक्यातील चौथी घटना होय . तेजराम बकाराम कार ( 45 ) रा . कन्हाळगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे . शुक्रवारी सकाळी ते गावातील मनोज शालिक प्रधान ( 30 ) याच्यासोबत शेतातील धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते . पिकाची पाहणी करून शेळ्यांसाठी चारा म्हणून झाडाच्या फांद्या तोडावयास गेलेल्या तेजरामवर वाघाने अचानक हल्ला केला . चढविला . हा थरार पाहून मनोजने प्रचंड आरडा ओरड केली . घटनेची माहिती मोबाईलवरुन गावकऱ्यांना दिली . गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली . दरम्यान , गावकऱ्यांनी वनविभागाला माहिती देताच वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांच्या नेतृत्वात वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले , भंडारा उपवनसंरक्षक राहुल गवई कन्हाळगावकडे रवाना झाले . पोलीस व वन कर्मचाऱ्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला .
*लाखांदूर तालुक्यातील चौथी घटना*
लाखांदूर तालुक्यात वर्षभारात . सीटी -1 वाघाने चौघांचा बळी घेतला . त्यामध्ये 27 जानेवारी रोजी दहेगाव जंगलात सरपन आण्ण्यासाठी गेलेला लाखांदूर येथील प्रमोद चौधरी ( 54 ) , 4 एप्रिल रोजी इंदोरा येथील जंगलात मोहफूल गोळा करण्यासाठी गेलेला जयपाल कुंभरे ( 40 ) , आठवडाभरापूर्वी 21 सप्टेंबर रोजी विनय खंगन मंडल ( 45 ) रा . अरुणनगर आणि आज 30 सप्टेंबर रोजी तेजराम कार या शेतकऱ्या ठार केले . या वाघाने भंडारा , गोंदिया , गडचिरोली चंद्रपूर या 4 जिल्ह्यात 13 जणांचा बळी घेतला आहे .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.