आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️फिट इंडिया फ्रीडम रन व प्लॉग रनचे आयोजन..

कार्यकारी संपादक -: राज जांभुळकर.

गडचिरोली -: दि.30: युवा व खेल मंत्रालय नवी दिल्ली यांच्या पुढाकाराने फिट इंडिया फ्रिडम रन 3 कि.मी. राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्य दि. 02 ऑक्टोंबर ते दि. 31 ऑक्टोंबर या कालावधीत फिट इंडिया फ्रिडम रन चे आयोजन करण्यात येणार आहे. स्वच्छता व तंदुरुस्ती असे दोन्ही उद्देश साद्य करण्याकरीता जॉगींग/ रनिंग करतेवेळी रस्त्यात दिसणारा कचरा हाताने उचलून कचऱ्याच्या पिशविमध्ये गोळा करीत जॉगींग/ रनिंग करणे याकरीता दि. 02 ऑक्टोंबर रोजी प्लॉग रनचे आयोजन इंदिरा गांधी चौक, गडचिरोली पासून ते जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली पर्यंत सकाळी 07.00 वाजता आयोजन करण्यात येणार आहे.

“फिट इंडिया फ्रिडम रन” व “फिटनेस का डोज, आधा घंटा रोज” हा उपक्रम दि. 02 ऑक्टोंबर ते दि. 31 ऑक्टोंबर या कालावधीत जिल्ह्यात सर्वत्र राबवायचा असून फिट इंडिया फ्रिडम रन 3 कि.मी. धावण्याकरीता नागरीकांनी / खेळाडूंनी / गृहीणींनी त्यांच्या सोईनुसार कुठेही, कधीही चालू किंवा धाऊ शकतात. प्रत्येकानी आपआपल्या आवडीचा मार्ग व्यक्तीश: आणि अनुकुल वेळ निवडावी. आवश्यकता वाटल्यास काही वेळाची विश्रांती सुद्धा घेऊ शकतात. प्रत्येकाला स्वत:च्या वेगाने धावणे किंवा चालण्याची मुभा असणार आहे. सदर उपक्रमात सहभागी झाल्यानंतर सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने या उपक्रमात सहभाग घेतल्याबाबतचा डेटा स्वतंत्रपणे (www.fitindia.gov.in) या संकेतस्थळावर मोबाईल ॲपद्वारे किंवा इतर ॲप द्वारे अपलोड करावे. उपरोक्त माहिती अपलोड केली असता त्यामध्ये सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र ई-मेलद्वारे आपणास प्राप्त होणार आहे. उपरोक्त फिट इंडिया फ्रिडम रन 3 कि.मी. करीता गडचिरोली जिल्ह्यातील संघटक म्हणुन जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली यांचे रजिस्ट्रेशन करण्यात आलेले आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने आपली वैयक्तीक माहिती (www.fitindia.gov.in) या संकेतस्थळावर अपलोड करावी असे आव्हान जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी केले आहे व जास्तीत जास्त संख्येने दि. 02 ऑक्टोंबर रोजी सकाळी 07.00 वाजता Plog Run करीता उपस्थित राहावे व उपरोक्त संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.