आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️18 ऑक्टोंबर 2022 वाढदिवसानिमित्त विशेष लेख..

▪️पत्रकारिता क्षेत्रातील समाजसेवी व्यक्तिमत्व - डी. के. आरीकर

मुख्य संपादक – श्री. तुळशीराम जांभूळकर

पत्रकारिता क्षेत्रात एक झुंजार व्यक्तिमत्व म्हणून मा. डी. के. आरीकरांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. परंतु त्याचबरोबर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, राजकारण आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात पण आपले नाव चमकवले आहे. भंडारा जिल्हा ही त्यांची जन्मभूमी व अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. परंतु आयुष्यात काहीतरी करून दाखवायची उर्मी असल्यामुळे त्यांनी बाबासाहेब यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या चंद्रपूरला आपली कर्मभूमी मानली व फुले, शाहू, आंबेडकर विचार धारेचा प्रसार आणि प्रचारासाठी आपले समस्त आयुष्य वेचण्याचा निर्धार करून आजतागायत त्याच वाटचालीवर कार्यरत आहेत. ते बहुजन ललकार या वृत्तपत्राचे संस्थापक संपादक असून अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी सदा तत्पर असतात.डी. के. आरीकर यांनी लग्नात अनाठाई खर्चाला फाटा देऊन एकही रुपयाचे प्रेझेन्ट न घेता सामूहिक पद्धतीने विवाह करून समाजापुढे आदर्श निर्माण केला असून पत्रकारांच्या व्यथा व वेदना शासन दरबारी मांडून त्यांना न्याय देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. “भले तर देऊ कासेची लंगोटी “, नाठाळाच्या माथी देऊ काठी ” या संत तुकारामच्या अभंगात दर्शविल्या प्रमाणे त्याची पत्रकारितेची वाटचाल सुरु आहे. त्यानी अत्यंत जीवाभावाचा मित्र परिवार जोडला असून माणसांना कसे जोडावे याचे कसब त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. कारण माणसे जोडली तर समाज आपोआप जोडला जातो. अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे ते पदाधिकारी असून जोतिबांचा वैचारिक वारसा प्रसिद्ध कवि प्रा.वाकूडकर प्रा. बळवंत भोयर,किशोर पोतनवार, हिराचंद बोरकुटे,हरीश ससणकर, प्रा. माधव गुरनुले पांडुरंग गावतुरे, अरुण धानोरकर, एच. बी. पटले ल. वी. घागी, पी. एम. साहनी, सुरेश शर्मा, निपचंद शेरकी, उमाकांत धांडे, महेंद्र शेरकी, डॉ. देव कन्नाके, दिनेश एकवणकर एडवोकेट गोविंदराव भेंडारकर, गुणेश्वर आरीकर, राजेश सोलापुर, नथू पाटील आरेकर, पुरुषोत्तम चौधरी, अनिल देठे, पुंडलिक आरिकर , बी एस सुखदेवे, दलित मित्र अशोक रामटेके, आनंद नडपते, रामदास सार्वे, दिगंबर मेश्राम, ग्रामगीताचार्य बंडोपंत घोडेकर, हरीश सहानी काही काळ आधी सोडून गेलेले दलित मित्र वामनराव सिंघम, एडवोकेट भगवान पाटील, रऊफ पटेल, एस.टी . चिकटे व अशोक खंडाळे यासारख्या जीवाला जीव देणाऱ्या सहकार्याच्या साहाय्याने पुढे चालवीत आहेत. ओबीसिंच्या प्रस्नावर नेहमी ते लढा देत असतात. शासन दरबारी ओबीसिंची जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी सातत्याने आंदोलणे,मोर्चे, धरणे करण्यात त्यांचा सिहाचा वाटा आहे. एवढ्यावरच न थांबता 2001 मध्ये ऍड. भगवान पाटील व ऍड. गोविंद भेंडारकर यांच्या पुढाकाराने हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. ओबीसिंनी धार्मिक कर्मकांड, देवभोळे पणा, अंधश्रद्धा, बुवाबाजी यापासून दूर राहून आपली नाळ फुले,शाहू, आंबेडकरांच्या विचारांसी जोडावी याबाबत ते सतत प्रयत्नशील राहून जनप्रबोधन करीत असतात. आपल्या आश्रय कालनीत त्यांनी आमदार खासदार फंडातून सिमेंट चे रस्ते, सामाजिक सभागृह, वॉल कंपाउंड इलेक्ट्रिक पोल, लाईट इत्यादी कामे केली असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असले तरी त्यांचे विभिन्न पक्षातील आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी यांचेशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे त्यांना नकार देणे सहजासहजी शक्य होत नाही हेही तेवढेच खरे! पर्यावरण सवर्धणासाठी त्यानी कंबर कसली असून नेहमीच कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाचे निमित्त साधून ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करीत असतात. आपल्या आश्रय कॉलनीला त्यांनी नंदनवन बनवून टाकले. फुलझाडाने व फळझाडाने बहारलेले दिवंगत किसनजी आरीकर उद्यान – याची साक्ष देते. डी. के. आरीकर हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे खंदे समर्थक असून आपल्या नवीन घरात गृह प्रवेश करण्याची वेळ आली तेव्हा पारंपारिक कर्मकांडाला फाटा देऊन शिवाजी महाराज, जिजाऊ, संत तुकाराम, फुले व आपल्या आई, वडिल यांच्या प्रतिमांना वंदन करूनच गृह प्रवेश केलेला आहे.
डी. के. आरीकर यांनी मरणोत्तर नेत्रदान व देहादानाचा संकल्प केलेला असून जीवनभर तर समाजसेवा करूच पण मरणानंतर सुद्धा राष्ट्राला देह व डोळे अर्पण करण्याचा हा संकल्प स्तुत्य व समाजासाठी प्रेरणादायी आहे. तथागत बुद्धाच्या दानपरिमिते मधील हा एक नवीन अध्याय आहे. डी. के. आरीकर यांनी केलेल्या या कार्याची फलश्रुती म्हणूनच महाराष्ट्र शासनाने त्यांना 2012 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (दलित मित्र )देऊन त्यांचा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते औरंगाबाद येथे गौरविण्यात आले होते. त्याचबरोबर त्यांनी समाजातील आदिवासी सारख्या दुर्बल घटकासाठी केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाच्या 2018-2019 च्या आदिवासी सेवक पुरस्काराने नागपूर येथे सन्मानित करण्यात आले. आणि ही आमच्या सारख्या त्यांच्या चाहत्या वर्गासाठी अत्यन्त आनंदाची व अभिमानाची बाब आहे. असे हे झुंजार पत्रकार, समाजसेवी, पर्यावरण प्रेमी, सामाजिक न्यायाचे पुरस्करते, अंधश्रद्धा, नेत्रदान, देहदान व रक्तदान चळवळीचे प्रचारक मा. डी. के. आरीकर येत्या 18 आक्टोबर 2022 ला 6४ व्या वसंतात प्रवेश करीत आहेत. नेहमी चेहऱ्यावर स्मित हाश्याची लकेर ठेवणाऱ्या व चिरतरुण असणाऱ्या या व्यक्तिमत्वाला मंगलकामना व्यक्त करतो व म्हणतो की “फुलोकी खुशबू रंगत दे आपको, सुरज की किरणे रोशनी दे आपको, हमतो कुछ दे सकते नही बधाई के सीवा, कुदरत हजारो सालकी जिंदगी दे आपको, जिंदगी दे आपको, जिंदगी दे आपको! ले. प्रदीप अडकीने, चंद्रपूर मो. न. 9421877022

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.