आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️कामगार चळवळीतले नेते श्री. बिजेंद्र कुमार सिंह यांची छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती.

सुबोध सावंत – मुंबई विभागीय प्रतिनिधी

बेलापूर सी बी डी: (इंडिया 24 न्यूज ). भाजप प्रणित छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेनेच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी श्री. बिजेंद्र कुमार सिंह यांची नियुक्ती,संघटनेचे अध्यक्ष श्री.संजयजी पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्रक देऊन करण्यात आली.सोबत भाजप कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष श्री.गणेश भाऊ साठे, सरचिटणीस श्री.प्रमोद जाधव,कोकण विभाग अध्यक्ष श्री. कमलेश राणे यांच्या उपस्थतीत व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

श्री. बिजेंद्र कुमार यांनी कामगार चळवळी मध्ये भरपूर योगदान दिले आहे, त्यांच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर त्यांना पदोन्नती देण्यात आली. कार्यक्रमा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री.अंशुमन सिंह व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.