आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️२००८ सालचा मालेगाव बॉम्बस्फोट खटला ; साक्षीसाठी पाचारण केेलेल्या दोन साक्षीदारांचा मृत्यू..

सुबोध सावंत – मुंबई विभागीय प्रतिनिधी

मालेगाव(इंडिया 24 न्यूज )येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यात तपासण्यात येणाऱया दोन साक्षीदारांचा मृत्यू झाल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एन.आय.ए.) मे. विशेष न्यायालयात दिली.
या दोघांना साक्षीसाठी पाचारण करण्यात आले होते.:
दोनपैकी एका साक्षीदाराने प्रकरणाचा याआधी तपास करणार्‍या राज्य दहशतवादविरोधी पथकाला (ए.टी.एस.) जबाब देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
(आर.एस.एस.) प्रमुख
मोहन भागवत आणि इंद्रेश कुमार यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे सांगितले होते,
असा तपास यंत्रणेचा दावा होता.
दरम्यान, खटल्याच्या सुनावणीच्या वेळी उपरोक्त दोन्ही साक्षीदारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची माहिती सरकारी वकील अविनाश रसाळ यांनी मे.विशेष एन.आय.ए. न्यायालयाला दिली.
दोन्ही साक्षीदारांच्या मृत्यूचे दाखलेही रसाळ यांनी यावेळी मे.न्यायालयात सादर केले.
भा.ज.पा. खासदार साध्वी प्रज्ञा सिंह आणि कर्नल प्रसाद पुरोहित आरोपी असलेल्या या खटल्यात आतापर्यंत २७ साक्षीदार फितूर झाले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.