आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️चंद्रपुरातील दुर्गापूर येथे तरुणाचा निर्घृण खून केल्यानंतर शिरच्छेद..

▪️जुना वैमनस्यातून केली धारधार शास्त्राने हत्या - धडावेगळे केले शीर..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) : चंद्रपूरलगत असलेल्या दुर्गापूर परिसरात चंद्रपूर वीज निर्मिती केंद्राच्या मेजर गेट जवळ नायरा पेट्रोल पंपजवळ एका इसमाची धारदार शास्त्राने धडावेगळे शीर करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी रात्री 10.45 वाजताच्या सुमारास घडली. महेश मेश्राम ( 32 ) रा . आयप्पा मंदिर परिसर चंद्रपूर असे मृतकाचे नाव असल्याचे बोलले जात आहे.

या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळापासून काहीच अंतरावर दुर्गापूर पोलीस ठाणे आहे. सुमारे ४-५ जणांनी मिळून आरीने शीर कापून हत्या केल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती होताच दुर्गापूर पोलिसांनी घटनेचे गांभीय लक्षात घेऊन लगेच घटनास्थळावरून हलविला. दुर्गापूर परिसर हा गुन्हेगारीच्या दृष्टीने अतिसंवेदनशील मानला जातो. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. मृतकाने काही दिवसांपूर्वी कुणाला तरी मारहाण केली होती. यातूनच ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळाजवळ इमली बियर बार आहे. या बारमध्ये भांडण झाले. येथून महेश मेश्राम याला अज्ञात आरोपींनी मारहाण करीत पेट्रोल पंप परिसरात नेले. तेथे दगडानेमारहाण करीत पेट्रोल पंप परिसरात नेले. तेथे दगडाने मारहाण केली. यानंतर धारधार शस्त्राने शीर धडावेगळे करून हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे. रात्री 12.00 वाजता पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.