आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️व्यापाऱ्यांचे धान्य गोडाऊन भरल्यानंतर धान केंद्र सुरु होणार का ? संदिप लंजे यांचा शासनाला संतप्त सवाल..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

लाखांदूर : ( इंडिया 24 न्यूज ) – मागील २० ते २५ दिवसापासून जिल्ह्यासह लाखांदूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात हलक्या धानाच्या गोदाम धानाने भरल्यानंतरच शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सरकार सुरु करणार काय ? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते संदिप लंजे यांनी शासनाला केला आहे . धान पिकाची कापणी व मळणीचे हंगाम जोरात सुरु झाले आहे . अशा परिस्थितीत घाम गाळून पिकविलेले धान साठविण्यासाठी शेतकऱ्यांच्या घरी जागा उपलब्ध नाही . अशातच शासनाने अजूनपर्यंत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु केले नाही . त्यामुळे धानपिकाची लागवड केली. लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या धामला कवडीचेही मोल भावाने खरेदी केली जात आहे. कोणत्याही गावागात मोठे उद्योग धान खरेदी विक्री केंद्र सुरू नसल्याने. खाजगी व्यापारी यांना स्वस्त दरात धान विकावे लागते. धंदे नसल्याने येथील शेती मुख्य लागत असून यात शेतकऱ्यांचे व्यवसाय शेती आहे . शेती मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवसाय करणे व त्यातून नुसान होत आहे . खाजगी धानाचे उत्पादन निसर्गाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना बसत असून हवामान खात्याचा अंदाजही चुकीचा ठरत आहे . यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हलक्या धानाच्या घेऊन व्यापारी मात्र यात मालामाल होत आहेत . शासनाच्या दिरंगाईचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत असून खाजगी व्यापाऱ्यांचे घर व आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणे अशी दिनचर्या सुरु आहे . यंदा पाऊस दमदार पडल्याने नdya- नाल्याना पूर येऊन धानपीक सडली . मजुरीचे दर , रासायनिक खताचे भाव गगनाला ठोकले आहे. चिखल , रोवणीचे दर आज घडीला भरपूर वाढलेले आहेत. शेती परवडणारी नसली तरी शेती करतो . अशावेळी पावसाचा फटका रोगराईचे सावट यातच पार शेतकरी देशोधडीला लागला आहे . यावर्षी विविध रोगाने आक्रमक शेतपीकाला केले आहे . त्यामुळे लावलेली पूंजी निघेल असे मात्र दिसत नाही . त्यामुळे धानाच्या उतरीत कमालीची घट दिसून येत आहे . सध्या मोठ्या प्रमाणात हलक्या धान पिकाची मळणी सुरु आहे मात्र अजूनही शासनाने कोणत्याही गावांत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु केले नसल्याने शासनाप्रति जनतेत रोष व्यक्त करण्यात येत आहे तरी शासन प्रशासन यांनी दखल घेऊन मुरमाडी तालुक्यात धान खरेदी सुरु करण्याची मागणी संदिप लंजे लाखांदूर तालुका अध्यक्ष माहिती अधिकार पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना महाराष्ट्र राज्य यांनी केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.