आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️महाकाली कॉलरी परिसरातील रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करा..

▪️काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची मागणी..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : महानगरपालिका चंद्रपूरच्या माध्यमातून अमृतजल योजना अंतर्गत पाण्याची पाईपलाईन व ड्रेनेजच्या कामामुळे महाकाली कॉलरी परिसरातील आनंद नगर ,ब्लॅक डायमंड चौक ,प्रकाश नगर कपिल चौक, व मायनर्स क्वार्टर इत्यादी जागी रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे . खोदकामामुळे निघालेला मातीचा पावसामुळे चिखल होत आहे , ज्यामुळे लोकांना येण्या जाण्या साठी अत्यंत त्रास होत आहे . वाहने चालवताना वाहने स्लिप होत आहेत, ज्यामुळे नागरिकांना जीवाचा धोका निर्माण झालेला आहे.
अत्यंत गंभीर व आवश्यक परिस्थितीमध्ये रुग्णांसाठी रुग्णवाहिकेला येण्या जाण्या साठी अडथळा निर्माण होत असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये अत्यंत आक्रोशाची भावना निर्माण झालेली आहे.. चार चाकी वाहने अक्षरशः चिखलात फसत आहेत. चिखलामुळे अगदी पायी चालण्याची सुद्धा सोय नाही .तरी लवकरात लवकर महाकाली कॉलरी परिसरातील खड्डे बुजवण्यात यावे रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी या आशयाचे निवेदन महानगरपालिका चे सन्माननीय आयुक्त साहेब यांना देण्यात आले..!!
या प्रसंगी काँग्रेस चे माजी नगरसेवक राजेश रेवेल्लीवार, माजी नगरसेविका ललिताताई रेवेल्लीवार, काँगेस चे शिरीजकुमार गोगुलवार यांची प्रमुख्याने उपस्थिति होती..

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.