आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️नवी मुंबईत वकिलाचा भाेदू डाँक्टरच्या चुकीच्या इंजेक्शमुळे मृत्यू..

▪️व्याजासह ५१ लाखांच्या भरपाईचे राज्य ग्राहक आयाेगचे आदेश..

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

मुंबई :(इंडिया 24 न्यूज )नवी मुंबईतील एका वकिलाचा भोंदू डॉक्टरच्या चुकीच्या इंजेक्शनने व औषधांनी मृत्यू झाल्याची गंभीर दखल घेत त्या वकिलाच्या पीडित कुटुंबाला ५१ लाख ३७ हजार १३७ रुपयांची भरपाई प्रतिवर्ष १२ टक्के व्याजासह
(४ ऑक्टोबर २०१६ ते प्रत्यक्षात रक्कम दिली जाईपर्यंत)देण्याचा आदेश राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने नुकताच दिला.’डॉ. दत्तात्रय तेजेराव आगाडे याने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला’,
असा निष्कर्ष सुनावणीअंती नोंदवून आयोगाचे अध्यक्ष न्या. एस. पी. तावडे व न्यायिक सदस्य ए. झेड. ख्वाजा यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.सुमारे आठ वर्षांपूर्वी४ ऑक्टोबर २०१४ रोजी उत्तम आंधळे यांचा डावा खांदा दुखू लागल्याने ते नेरूळमधील डॉ. आगाडेच्या संजीवनी क्लिनिक या दवाखान्यात गेले होते.त्यावेळी डॉ. आगाडेने त्यांच्या कंबरेत डाव्या बाजूला ‘डायक्लोफनॅक’ हे वेदनाशामक इंजेक्शन दिले व काही औषधे दिली.मात्र, घरी गेल्यावर इंजेक्शन दिलेल्या शरीराचा भाग काळा-निळा पडून दुखू लागल्याचे उत्तम यांना जाणवले. दुसऱ्या दिवशी ते पत्नीसोबत पुन्हा दवखान्यात गेले.तेव्हा डॉक्टरने त्यांच्या कंबरेत उजव्या बाजूला पुन्हा तेच इंजेक्शन दिले.मात्र, घरी परतल्यावर उत्तम यांना अधिकच त्रास सुरू झाला. त्यांच्या पत्नीने मध्यरात्री वारंवार फोन करूनही डॉ. आगाडेने प्रतिसाद दिला नाही.अखेरीस पहाटे २ वाजता त्याने त्यांच्या कॉलला प्रतिसाद दिला आणि जवळच्या शाश्वत रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.त्याप्रमाणे उत्तम त्या रुग्णालयात गेले.मात्र, तिथेही वेळेत उपचार मिळाले नाहीत.त्यामुळे त्यांच्या पत्नीने त्यांना वाशीमधील सिद्धी रुग्णालयात हलवले.तेथील डॉ. मोहंती यांनी आधीचे वैद्यकीय उपचार चुकीचे झाल्याने पूर्ण शरीरात बाधा झाली आहे आणि शस्त्रक्रिया आवश्यक आहे, असे सांगितले.त्यानंतर आंधळे दाम्पत्य पुन्हा घरी परतले.त्यांना पनवेलमधील सुखम रुग्णालयात नेण्यात आले.गँगरीन होऊ नये म्हणून तो भाग काढून टाकण्याचा सल्ला देत तेथील डॉक्टरांनी ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले.परंतु, त्याच्या १५ मिनिटे आधीच म्हणजे संध्याकाळी ५.४५ वाजता उत्तम यांचे निधन झाले.’डायक्लोफनॅक हे सर्वसाधारण वेदनाशामक औषध आहे. त्यामुळे माझी काहीच चूक नाही. नंतरच्या उपचारांनी उत्तम यांची प्रकृती अधिक बिघडली ,असा दावा डॉ. आगाडेने आपल्या बचावार्थ केला.तर डायक्लोफनॅक इंजेक्शन देण्यासाठीही विशिष्ट कौशल्य व ज्ञान आवश्यक असते. असे मत नोंदवत डॉ. आगाडेने उपचार देण्यात हलगर्जी केल्याचा स्पष्ट अभिप्राय ठाणे सरकारी रुग्णालयाच्या शल्यविशारदांनी दिला.उत्तम यांच्या पत्नीने भा.दं.वि. व महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कायद्यांतर्गत एफ.आय.आर. नोंदवल्यानंतर पोलिसांनी शल्यविशारदांचा हा अहवाल मिळवला.त्याशिवाय डॉ. आगाडेने खोट्या गुणपत्रिकेच्या आधारे बिहारच्या मुझफ्फरपूर येथील बिहार विद्यापीठाचे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवल्याचेही पोलिस तपासात उघड झाले.या साऱ्याची दखल घेत आयोगाने डॉ. आगाडेला दोषी ठरवले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.