आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
▪️पत्रकार अरुण मादेशवार यांना लिजेंडरी पीस काउन्सिलकडून डॉक्टरेट..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक
सिंदेवाही – ( इंडिया 24 न्युज ) : दि. ९ जेष्ठ पत्रकार आणि ‘चांदा न्यूज’ चे संपादक, श्री. अरुण मादेशवार यांना ‘लिजेंडरी पीस काउन्सिल’ च्या वतीने डॉक्टरेट जाहीर झाली आहे.
मानवाधिकार आणि सामाजिक न्याय क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना ही पदवी प्रदान केली जात आहे.
येत्या काही दिवसांत दिल्ली येथे एका विशेष समारंभात त्यांना ही पदवी प्रदान केली जाईल. श्री. अरूण मादेशवार यांच्या या यशाबद्दल त्यांचे मित्र आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या या सन्मानामुळे ग्रामीण पत्रकारिता आणि सामाजिक कार्याला एक नवीन ओळख मिळाली आहे.