▪️बोगस बी.एड धारकांना निलंबित करून,लाभ वसूलीची मागणी..!
▪️शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांवर कारवाईचे वरिष्ठांचे निर्देश..!
मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
नागभिड – ( इंडिया 24 न्युज ) : राज्यात बोगस दिव्यांग प्रकरण गाजत असताना नियमित बी.एड धारक शिक्षकांवर कारवाई ची टांगती तलवार आहे.जिल्ह्यात यापूर्वी बोगस बी.एड नियमितपणे करणारे शिक्षकांवर कारवाई साठी विविध संघटनांच्या माध्यमातून लक्षवेधी तक्रारी दाखल झाल्यात परंतु तत्कालीन व विद्यमान शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी दखल घेऊन कारवाई केली नाही. राजकुमार चिकटे जिल्हाध्यक्ष मागासवर्गीय कर्मचारी संघटनांची कृती समिती व सागर शंभरकर जिल्हाध्यक्ष स्वतंत्र समता शिक्षक संघटना जिल्हा चंद्रपूर यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या.
अनेक वर्षांपासून बोगस बी.एड धारक यांच्यावर कारवाई संबंधाने निवेदन सादर करण्यात आली आहे.पण लबाडीने कारवाई होत नाही असे खेदाने म्हणावे लागते.
विभागीय आयुक्त यांचे निर्देश असताना जाणीवपूर्वक लबाडीने दुर्लक्ष केल्याने शासनाची फसवणूक करणाऱ्या शिक्षकांना संरक्षण देत असल्याचं दिसून येतं आहे.
शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना बोगस बी.एड शिक्षकांची माहिती अधिकार अंतर्गत मागितलेली माहिती शिक्षण विभागाने दडवून ठेवल्याने, माहिती अधिकार कायद्याच्या विसंगत वर्तणूक केली आहे.काही बी.एड धारकांच्या संबंधात कारवाईचे निर्देश विभागीय आयुक्त नागपूर व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देवूनही शिक्षण विभागाने लबाडीने संरक्षण दिले जात आहे अशी जिल्हात चर्चा आहे.
शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांवर कारवाईचे वरिष्ठांचे निर्देश
शिक्षण उपसंचालक नागपूर यांचे पत्र दि. १७ जुलै २०२५ पत्राने शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांवर कारवाईचे निर्देश दिल्यानंतर अहवाल मागणीची कारवाई प्रक्रिया जलद गतीने सुरू आहे.मात्र काही शिक्षकांची माहिती लबाडीने दडवून ठेवल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण आजपर्यंत लबाडीने संरक्षण दिल्याने प्रशासनाकडून दखल घेऊन कारवाई केली नाही. पत्रात नमूद केले की, कार्यरत शिक्षकांने अनियमित डी.एड. किंवा बी.एड. केल्यास त्यांचेवर कारवाई न केल्याने , सबंधीत शिक्षणाधिकारी तसेच मुख्याध्यापकांवर कारवाई करणे संबंधाने मा. शिक्षण उपसंचालक नागपूर यांचे पत्र दि. १७ जुलै २०२५ व २५ आगस्ट २०२५ नुसार निर्देश दिल्याने जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना अहवाल सादर करण्यासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी पत्र पाठवून अहवाल पाठविण्याचे सर्व गटशिक्षणाधिकारी यांना कळविले होते.
परंतु आजपर्यंत अहवाल अप्राप्त असल्याने वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यप्रणालीवर शंका निर्माण झाली आहे.आजपर्यंत दिनांक ४ जुलै २०२५ , ८ सप्टेंबर २०२५ दिनांक १३ आक्टोंबर २०२५ ला पत्र दिले होते. पुनश्च ८ डिसेंबर २०२५ ला पत्र पाठवून अहवाल मागितला आहे. काही गटशिक्षणाधिकारी यांनी कार्यरत शिक्षकांपैकी परवानगी न घेणारे शिक्षक अशा आशयाचे प्रमाणपत्र सादर केले आहे.मात्र संबंधित पत्रानुसार माहिती सादर केले नसल्याचे चौकशीअंती कळले.
एकाच वेळी दोन्ही ठिकाणी उपस्थित असल्याने बी.एड अमान्य
कार्यरत शिक्षकाने बी.एड एकाच वेळेस दोन आस्थापनेवर ठिकाणी हजर राहिलेल्याने शिक्षकांचे बी.एड. यापूर्वी सुध्दा अमान्य करून बी.एड लाभ नाकारण्यात आले आहेत असे नमूद केले आहे.परंतु कोणाचेही लाभ वसूलीची कारवाई केली नाही.शिक्षकांनी शाळेत नियमित कार्यरत असताना बी.एड. चे उच्च शिक्षण प्राप्त केलेले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या मुक्त विद्यापिठा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठातून बी.एड. शिक्षण पूर्ण केले आहे जे अवैध ठरते. त्यामुळे त्याला मान्यता/ लाभ देता येत नाही. यापूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बोगस बी.एड प्रकरणात लाभ वसूली व भविष्यात पदवीचा लाभ देण्यात येवू नये असा निर्णय घेतला होता.परंतू तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी कारवाई केली नाही.
मागणी:- सेवेत राहून नियमित बी. एड. केलेल्या शिक्षकावर त्यांच बी. एड. अमान्य करण्यात यावे व आर्थिक लाभ घेतल्याने वेतनातून वसुल करण्यात यावे. व केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या पत्रात नमुद केलेले आहे. शासनाची फसवणूक केल्याने भविष्यात पदवीचा लाभ देण्यात येवू नये. नियमांची पायमल्ली केल्याने दिलेले सर्व लाभ वसूल करून, शिस्तभंग विषयक कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
कोट :” नियमित बी.एड करून, एकाच वेळी दोन्ही ठिकाणी उपस्थित राहून शिक्षकांनी केलेला विक्रम ‘न भूतो न भविष्यती’ आहे. शासनाची फसवणूक केल्याने आणि नियमांची पायमल्ली झाल्याने, शिस्तभंग विषयक आणि लाभ वसूलीची कारवाई होणे आवश्यक आहे.”सागर शंभरकर जिल्हाध्यक्ष स्वतंत्र समता शिक्षक संघटना जिल्हा चंद्रपूर



