▪️जिल्हा परिषद चंद्रपूर शिक्षण विभागातील शिक्षकांच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत पदोन्नत्या शिक्षक बदल्यापूर्वी?
▪️शालेय गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे प्रभारी केंद्र प्रमुख असलेल्या शिक्षकांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष..!

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : जि.प. शिक्षकांमधून वरिष्ठ/कनिष्ठ विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व उच्च श्रेणी मुख्याध्यापक या पदांच्या पदोन्नत्या केल्या जातात. परंतु आता काही शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत व काही सेवानिवृत्त झाले. पण त्यांना पदोन्नतीचा लाभ झाला नाही. याचे प्रमुख कारण प्रशासनाची उदासीनता आहे.शिक्षक बदली पूर्वी पदोन्नती करण्याचे निर्देश असताना सुद्धा जिल्हा परिषद शिक्षण विभाग मात्र पदोन्नती देण्यासाठी विलंब का करित आहे हे एक मोठे कोडेच आहे.
जिल्ह्यात विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख व उच्च श्रेणी मुख्याध्यापक अधिक जागा रिक्त आहेत. परंतु शासन सरळसेवा भरतीद्वारे विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख जागांची भरती करत नाही; तर दुसरीकडे जि. प. प्रशासन पदोन्नती करत नाही. त्याचा परिणाम सहाजिकच शिक्षण प्रक्रियेवर होतो. तसेच पर्यवेक्षीय यंत्रणा कमी असल्याने शाळा व गुणवत्ता तपासणीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. परिणामी शाळेची पटसंख्या झपाट्याने खालावली जात आहे. प्रभारी विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांच्या खांद्यावर ओझे देवून, शैक्षणिक नुकसानीसाठी प्रशासन जबाबदार असल्याचे लक्षात आले आहे.कितीतरी शिक्षकांना केंद्र प्रमुख प्रभार दिल्याने, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीसाठी जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे.
अशा परिस्थितीत आपली पदोन्नती होणार या आशेने जानेवारीपासून शिक्षक चातक पक्षाप्रमाणे आदेशाची वाट पाहत आहे. शिक्षकांच्या सार्वजनिक बदल्यापूर्वी म्हणजे ३१ मे पूर्वी पदोत्रती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी असा शासनादेश होता, दि. ९ जून २०२५ च्या सेवाविषयक बाबीच्या अनुषंगाने १५० दिवसाच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत पदोन्नत्या करणे अपेक्षित होते. परंतु या ना त्या कारणाने पदोन्नतीला विलंब होत आहे. पदोन्नती पात्र शिक्षकांनी आपल्या गोपनीय अहवालासह अन्य कागदपत्रांची पूर्तता मे महिन्यातच केली.
अशातच शिक्षक जून २५ ला सेवानिवृत्त झालेत. पण त्यांना पदोत्रतीचा लाभ मिळाला नाही जुलै २५ ला सुद्धा अनेक शिक्षक सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे सेवानिवृत्तीपूर्वी आता तरी पदोत्रतीचा शिक्षकांना लाभ घेता यावा. यासाठी पदोन्नती सप्टेंबर २०२५ पूर्वी करावी अशी मागणी होत आहे. शासनाच्या , दि. ९ जून २०२५ च्या सेवाविषयक बाबीच्या अनुषंगाने १५० दिवसाच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत आदेशाचा अवमान होणार नाही आणि सेवानिवृत्त होण्यापूर्वी शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ घेता येईल यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन, पदोन्नती देण्यासाठीची कारवाई संबंधाने गतिशीलता वाढवून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लागेल का?