ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुण्याचे ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा..!

▪️सर्वोत्कृष्ट नागपूरचे ‘रंगबावरी’ नाट्यकृती द्वितीय..!

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर : ( इंडिया 24 न्युज ) – दि. ०७ ऑगस्ट २०२५:
महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागाच्या संघाने ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा’ या नाटकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण करीत प्रथम क्रमांकाचा करंडक पटकाविला. तर नागपूर प्रादेशिक विभागातील चंद्रपूर परिमंडळाचे ‘रंगबावरी’ या नाटकाने द्वितीय क्रमांकाचा मान पटकाविला.
येथील महाकवी कालिदास कलामंदिरात महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अतिशय दर्जेदार व विविध विषयांचा वेध घेत घेणाऱ्या चारही प्रादेशिक विभागाच्या नाट्यकृतींना नाशिककर रसिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या नाट्यस्पर्धेतील सांघिक, वैयक्तिक विजेते व उपविजेत्यांचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र व संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी अभिनंदन केले.
दोन दिवसीय राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचा बुधवारी (दि. ६ ) सायंकाळी समारोप झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य महाव्यवस्थापक (प्रवसु.) अरविंद भादीकर, मुख्य तपास अधिकारी दत्तात्रय बनसोडे, नाट्यस्पर्धेचे निमंत्रक व मुख्य अभियंता सुंदर लटपटे, मुख्य अभियंते हरिष गजबे (चंद्रपूर), चंद्रमणी मिश्रा (कल्याण), संजय पाटील (भांडुप), पवनकुमार कछोट (छत्रपती संभाजीनगर), नाट्यस्पर्धेचे मुख्य समन्वयक व मुख्य औद्योगीक संबंध अधिकारी संजय ढोके यांची उपस्थिती होती. या पाहुण्यांच्या हस्ते नाट्यस्पर्धेतील विजेत्या संघांना करंडक तसेच वैयक्तिक गटातील विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. नाट्यस्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रभाकर दुपारे, चंद्रकांत जाडकर, मीनाक्षी केंढे यांनी काम पाहिले.
राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे –
सर्वोत्कृष्ट नाटक: प्रथम-डॉक्टर, तुम्ही सुद्धा! (पुणे), द्वितीय-रंगबावरी प्रादेशिक कार्यालय नागपूर (चंद्रपूर परिमंडळ)
दिग्दर्शन : प्रथम – ज्ञानदेव पडळकर (पुणे), द्वितीय – संध्या चिवंडे प्रादेशिक कार्यालय नागपूर (चंद्रपूर परिमंडळ)
अभिनय (पुरुष) : प्रथम – विजय जोशी (पुणे), द्वितीय – श्रावण कोळनुरकर (छत्रपती संभाजीनगर)
अभिनय (स्त्री) : प्रथम – रोहिणी ठाकरे प्रादेशिक कार्यालय नागपूर (चंद्रपूर परिमंडळ), द्वितीय – भक्ति जोशी(पुणे)
नेपथ्य : प्रथम – सतीश सरोदे (पुणे), द्वितीय – राम मेस्त्री (कोकण)
प्रकाशयोजना : प्रथम – अभय येरडे(छत्रपती संभाजीनगर), द्वितीय – अभिजीत सिकनिस (कोकण)
संगीत : प्रथम – रुपेश देशमुख (नागपूर), द्वितीय – अनिल राजपूत (छत्रपती संभाजीनगर)
रंगभूषा व वेशभूषा : प्रथम – विकास पुरी (पुणे), द्वितीय – प्रशांत ठाकरे प्रादेशिक कार्यालय नागपूर (चंद्रपूर परिमंडळ)
उत्तेजनार्थ (अभिनय) : श्रद्धा मुळे (कोकण), सचिन निकम (पुणे), सायली सायनकर प्रादेशिक कार्यालय नागपूर (चंद्रपूर परिमंडळ)
आणि रमेश शिंदे (छत्रपती संभाजीनगर) यांना सन्मानित करण्यात आले.
पारितोषिक वितरण सोहळ्याला राज्यभरातील महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते, अधिकारी, कर्मचारी व नाट्यरसिक बहुसंख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ- नागपूर प्रादेशिक विभागाच्या चंद्रपूर परिमंडळाचे “रंगबावरी” या नाट्याच्या विजेत्या कलावंतांसोबत सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे व मान्यवर.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.