आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

वारकरी समाजसेवक गजानन हरणे यांचा भावपूर्ण गौरव.

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

अकोला – ( इंडिया 24 न्युज ) :
श्रीक्षेत्र श्रद्धा सागर ते साक्षात विठुरायाच्या पंढरपूरकडे निघालेली आध्यात्मिक व भक्तिभावाने ओतप्रोत भरलेली “वारी (दिंडी)”जी फक्त पायी चालण्याचा प्रवास नव्हे, तर आत्मशुद्धी, सेवाभाव आणि समर्पण यांचा एक विलक्षण अनुभव असतो अशा पवित्र वारीमध्ये जिल्हा परिषद नगर खडकी अकोला येथील ज्येष्ठ समाजसेवक, वारकरी,निर्भय बनो जनआंदोलनाचे संयोजक गजानन ओंकार हरणे यांनी पूर्ण एक महिना स्वतः पायी चालत ६५० कि.मी.चा प्रवास भक्तिभावाने पार पाडला. कोणत्याही व्हीआयपी सुख सुविधा न घेता ही वारी फक्त त्यांच्या पायांची नव्हती, ती होती त्यांच्या सेवाभावाची, समर्पणाची आणि दृढ सामाजिक बांधिलकीची. वारीतील प्रत्येक पाऊल त्यांनी समाजप्रबोधनासाठी उचलले. फेसबुक, व्हॉट्सॲप, यूट्यूब आणि विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी वारीचे वृत्त संकलन करून, जनतेपर्यंत अध्यात्मिक वारशाचा प्रचार आणि प्रसार भावनापूर्ण व निस्वार्थ भावनेने केला. वारकऱ्यांचा श्रद्धा-सन्मान अबाधित ठेवत, त्यांनी एक सेवाभावी वृत्तपत्रकाराची भूमिका समर्थपणे पार पाडली.
या कार्याची दखल घेत श्रीसंत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, अकोट यांच्यावतीने अलीकडेच पार पडलेल्या समारोपी कार्यक्रमात, गजानन हरणे यांचा शाल, कपडे, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. हा सत्कार केवळ औपचारिक नव्हता, तर तो होता त्यांच्या समर्पण, सेवावृत्ती आणि अध्यात्म प्रेमाच्या जीवनमूल्यांचा सन्मान.
या गौरव सोहळ्याच्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष हभप वासुदेव महल्ले , उपाध्यक्ष माधव ठाकरे, सचिव रवींद्र वानखडे, सहसचिव अविनाश गावंडे, गजानन दुधाळ, अनिल कोरपे, व्यवस्थापक हभप अंबादास मानकर, मोहनराव जायले पाटील, सुनंदाताई आमले, नंदकिशोर हिंगणकर, केशवप्रसाद राठी, दानशूर व्यक्तिमत्व चिकटे साहेब, हभप सागर महाराज परिहार, हभप विष्णु महाराज गावडे, हभप मोहकार महाराज, मुख्याध्यापक जयदीप सोनकास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.या समारंभात बोलताना गजानन हरणे यांनी अत्यंत नम्रतेने सर्व वारकऱ्यांचे, संस्था पदाधिकाऱ्यांचे, आणि विशेषतः वृत्तपत्र व मीडियाचे मन:पूर्वक आभार मानले. “ही वारी माझ्यासाठी केवळ अध्यात्मिक नव्हती, ती माझ्या सामाजिक जीवनाचे एक नवे अध्याय ठरली. ही माझ्या जीवनातील वैभवशाली भेट आहे,” असे त्यांनी कृतज्ञतेने सांगितले.वरील कार्यक्रमातून हे प्रकर्षाने जाणवते की, आजच्या धावपळीच्या युगातही, समर्पण, निष्ठा आणि सेवाभाव असे त्रिसूत्री जीवन मूल्य असलेल्या व्यक्ती समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. गजानन हरणे हे त्याचे सजीव उदाहरण ठरले आहेत.
समाजात अध्यात्म, सेवा आणि पत्रकारिता या त्रयींचे एकत्रित दर्शन क्वचितच घडते. गजानन हरणे यांनी त्यांचा एक महिना चाललेला प्रवास हा केवळ पदयात्रा नव्हता, तो एका समाजपुरुषाचा जागृतीचा जागर होता. गेल्या चार वर्षापासून ते सातत्याने पायी वारी करू वारीचे वृत्त संकलन सेवाभाव वृत्तीने करीत आहेत.अशा व्यक्तिमत्त्वाचा सन्मान म्हणजे मूल्यांचाही सन्मान आहे. श्रीसंत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे अभिनंदन, ज्यांनी हा सन्मानभाव प्रकट केला त्यांचे मनापासून आभार या कार्यक्रमाला परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होता.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.