▪️जन सुरक्षा विधेयकावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा विरोधकांवर हल्लाबोल..
▪️ "फुले-शाहू-आंबेडकरांचा" वारसा जपण्याचे धाडस फक्त 'वंचितकडेच' ..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक
पुणे – ( इंडिया 24 न्युज ) : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हटले की, विरोधकांमध्ये फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारसरणीला पुढे नेण्याचे धाडस नाही. ते केवळ त्यांच्या नावाचा वापर करतात. तसेच त्यांची विचारसरणी फुले-शाहू-आंबेडकरांच्या मूल्यांच्या अगदी विरुद्ध आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून वंचित बहुजन आघाडीच खरा फुले-शाहू-आंबेडकरवादी वारसा जपत असल्याचे सांगितले. आपल्या ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, फुले-शाहू-आंबेडकर चळवळ आपल्या पूर्वजांनी रक्त आणि घामाने उभी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ही चळवळ नष्ट होण्यापासून वाचवणे हे आपले कर्तव्य आहे.
निवडणुकीच्या काळात फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव वापरणाऱ्यांना त्यांच्या पूर्वजांच्या कष्टाची आणि या महान नेत्यांच्या विचारसरणीची जाणीव कशी होईल, असा सवालही त्यांनी विचारला. त्यांनी पुढे नमूद केले की, विरोधकांमध्ये हे धाडस नाही, पण वंचित बहुजन आघाडीकडे ते धाडस आहे!
यातून त्यांनी वंचित बहुजन आघाडीची भूमिका अधिक स्पष्ट केली. जनसुरक्षा विधेयकासंदर्भातही त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, आम्ही जनसुरक्षा विधेयकाविरोधात न्यायालयात लढू! यातून वंचित बहुजन आघाडी कायदेशीर पातळीवरही सक्रिय राहील असे संकेत दिले आहेत.