▪️मूल तालुक्यात युरिया तुटवड्यामुळे शेतकरी चिंतेत..
▪️युरिया तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : खरीप हंगाम सुरु असूनही मूल तालुक्यात युरियाच्या तुटवड्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आले आहेत. पेरण्या योग्य पध्दतीने झाली असुन धानाचे रोवणे चालू आहेत.पाऊस पडल्याने पिकांना पिक वाढीसाठी युरिया खते अत्यावश्यक आहेत. मात्र शेतकऱ्यांना पर्यायी खते घेण्यास सक्ती केली जात आहे जर शेतकऱ्यांनी खते घेत नसल्यास युरीया खत मिळणार नाही असे कृषी केंद्रात म्हटले जात आहे. वेळेवर खत उपलब्ध न झाल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
काही ठिकाणी खत दुकानदारांकडून गोडाऊन मध्ये माल शिल्लक असुन सुध्दा माल नाही आहे म्हणुन शेतकऱ्यांना परत पाठविण्याचा प्रकार सुरु आहे. व शेतकऱ्यांना जादा दराने विक्री केल्या जात आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
याकडे प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे. त्यांनी खताची साखळी योग्य ठेवण्याची आणि काळाबाजार रोखण्याची विनंती करावी.
कृषी विभागाचे अधिकारी कारवाई करेल का? आणि नवीन युरिया साठा तालुक्यात उपलब्ध करुन देईल का?
तरीही, शेतकऱ्यांनी वेळेवर आणि योग्य दराने युरिया उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.