▪️सर्वोच्च न्यायालयाचा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अपात्र उमेदवारांना दिलासा..
▪️विजय बावणे, डॉ. विजय देवतळे, सुदर्शन निमकर यांचा निवडणूक लढन्याचा मार्ग मोकळा तर उल्हास करपे अविरोध..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
चंद्रपूर – ( इंडिया २४ न्यूज) : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येत्या १० जुलैला होऊ घातलेल्या संचालक मंडळाच्या निवडणूकीतून अपात्र झालेले उमेदवार विजय बावणे, माजी आमदार सुदर्शन निमकर, डॉ. विजय देवतळे व उल्हास करपे यांना सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्र. दि. ४ जुलैला दिलेल्या एका मोठा दिलासा मिळाला असून त्यांना बँकेची निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या आधी सदर उमेदवारांनी सन २०२३ – २४ चे ब वर्ग ऑडीट अहवाल न जोडता त्यांनी सन २०२४- २५ या आर्थिक वर्षातील ब वर्ग ऑडीट अहवाल नामांकन
अर्जासोबत सादर केले मात्र निवडणूक अधिकान्यांनी लगतचे धरून त्यांना अपात्र ठरविल्याने वर्ष हे सन २०२३-२४ असे गृहीत कोरपना तालुका अ गटातून शेखर थोटे तर राजुरा तालुका अ गटातून नागेश्वर ठगणे अविरोध निवडून आले होते मात्र त्यांचा अविरोध निवडून येण्याचा आनद औटघटकेचा ठरला आहे.
वरोरा तालुका अ गटातून डॉ. विजय देवतळे व गोंडपिंपरी तालुका अ गठातून उल्हास करपे यांनाही याच कारणास्तव अपात्र करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध विजय बावणे, माजी आमदार सुदर्शन निमकर, डॉ. विजय देवतळे व उल्हास करपे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात
अपिल केले. उच्च न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय कायम ठेवल्याने ते उमेदवार अपात्र ठरविण्यात आले.
मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध या उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयात अपिल केले. त्यावर आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने या उमेदवारांना पात्र ठरवून सन २०२४- २५ चा ब वर्ग ऑडीट अहवाल ग्राह्य धरण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीतून बाद झालेले उमेदवार पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात आले आहेत. यात कोरपना तालुक्यातून विजय बावणे, राजुरा तालुक्यातून माजी आमदार सुदर्शन निमकर, गोंडपिंपरी तालुक्यातून उल्हास करपे, वरोरा तालुक्यातून डॉ. विजय देवतळे यांचा समावेश
आहे.
यापैकी गोंडपिंपरी येथे करपेंच्या विरोधात उमेदवार नसल्याने ते अविरोध निवडून आले आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१ संचालक पदांसाठी २०२५-२६ ते २०३०.३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी निवडणूक होत आहे. निवडणूक नियमावलीनुसार, उमेदवारांनी
नामांकन पत्रासोबत मागील वर्षाचे लेखापरीक्षण जोडणे बंधनकारक होते. निवडणुकीची अर्हता तारीख १ फेब्रुवारी २०२५ असल्याने, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी २०२३ – २४ हे वर्ष ग्राह्य धरले. काही उमेदवारांनी २०२४-२५ चे लेखापरीक्षण जोडले, ज्यामुळे त्यांचे नामांकन रद्द झाले. यामुळे शेखर धोटे (कोरपना) आणि नागेश्वर ठेंगणे (राजुरा) यांनी अविरोध निवडणुकीचा जल्लोष साजरा केला. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे त्यांचा आनंद मावळला. गोंडपिपरीत अमर बोडलवार यांनी एक वर्षांचे अनुभव प्रमाणपत्र जोडले होते, परंतु त्यांचेही नामांकन रद्द झाले. उल्हास करपे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्याने ते अविरोध निवडून आले.