▪️IMA चंद्रपूर शाखेचं महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन..
▪️जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर..

*🔸श्री. सचिन ढगे*
*🔸चंद्रपूर तालुका प्रतिनिधी*
*🔸मो. नं. 9359692716*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) चंद्रपूर शाखेने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (MMC) ३० जून २०२५ रोजी जारी केलेल्या वादग्रस्त अधिसूचनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. या अधिसूचनेनुसार, केवळ एका वर्षाचा Certificate Course in Modern Pharmacology (CCMP) पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना MMC मध्ये नोंदणीची परवानगी देण्यात आली आहे.
IMA च्या मते, हा निर्णय संपूर्ण आधुनिक वैद्यकीय शिक्षणव्यवस्थेचा व नैतिकतेचा अवमान करणारा असून रुग्णांच्या आरोग्याशी गंभीर धोका निर्माण करणारा आहे.
या पार्श्वभूमीवर आज दिनांक ८ जुलै २०२५ रोजी IMA चंद्रपूर शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन सादर करण्यात आले.
या शिष्टमंडळात खालील मान्यवर डॉक्टरांची प्रमुख उपस्थिती होती:
डॉ. रितेश दीक्षित – अध्यक्ष, IMA चंद्रपूर
डॉ. मंगेश गुलवाडे – माजी उपाध्यक्ष, IMA महाराष्ट्र राज्य
डॉ. दीपक निलावार, डॉ. नरेंद्र कोलते, डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. प्रसाद पोटदुखे,
डॉ. अनुप पालीवाल, डॉ. भूपेश भलमे, डॉ. नगीना नायडू, डॉ. सुधीर रेगुंडवार
डॉ. सुश्रुत भुकते – सचिव, IMA चंद्रपूर
डॉ. स्नेहल पोटदुखे, डॉ. हर्ष मामीडवार,
डॉ अभय राठोड डॉ राहुल सैनानी
डॉ. अप्रतिम दीक्षित
IMA चंद्रपूर शाखेने यावेळी नागरिकांमध्ये जनजागृती केली. यामध्ये या अधिसूचनेचे दुष्परिणाम स्पष्ट करून शासनाला या निर्णयाविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
IMA महाराष्ट्र राज्याने यापुढील आंदोलनात्मक कृती जाहीर केली आहे, त्यामध्ये:
1. ८ जुलै रोजी राज्यभर जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देणे
2. ११ जुलै रोजी २४ तासांची एकदिवसीय आरोग्य सेवा बंद
3. १९ जुलै रोजी “चलो मुंबई” भव्य रॅली
IMA चंद्रपूर शाखेने स्पष्टपणे सांगितले आहे की जर शासनाने सदर अधिसूचना तात्काळ मागे घेतली नाही, तर लोकशाही मार्गाने संपूर्ण राज्यभर आंदोलन छेडले जाईल.