▪️चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील पावसामुळे पडलेले खड्डे लवकरात लवकर सुरळीत करा..
▪️मनसेचे जिल्हासचिव श्री. किशोर मडगुलवार यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर:- आम्ही चौफेर रस्त्यांची माहिती व चौकशी केली असता सर्वत्र पाउसाने कहर केला असून या मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य मार्गावरचं नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत त्यामूळे नागरीकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे नेहमी या रस्त्यावरुण मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते त्यामध्ये शालेय बस, रुग्णवाहीका शासकीय निमशासकीय वाहनांना तसेच सामान्य नागरीकांना अशा रस्त्यावरून ये जा करणे कठीन व धोक्याचे झाले असून वेळ प्रसंगी अपघात होऊन जीवीतहानी सुद्धा नाकारता येत नाही तेव्हा कोणतीहि दुर्घटना घडू नये यासाठी आपण रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवान्या संदर्भात संबधीत विभागाला सुचना देऊन नागरीकांना दिलासा द्यावा तसेच झालेल्या कार्यवाहीचा अहवाल लेखी स्वरूपात आम्हाला पाठवावा या आशयाचे निवेदन मनसेचे जिल्हासचिव श्री. किशोर मडगुलवार तथा मनविसे जिल्हा उपाध्यक्ष श्री. कुलदीप चंदनखेडे यांनी आज जिल्हाअधिकारी साहेब यांना दिले असुन निवेदन देणार्या शिष्टमंडळात विजय तुरक्याल जिल्हा उपाध्यक्ष जनहित कक्ष मनसे, प्रविण शेवते तालुका उपाध्यक्ष मनविसे, असलम खान वाहतूक सेना अँटो संघटना शहराअध्यक्ष, बंडू पेंदाम शाखाध्यक्ष, मंगेश आडे तथा मनसैनीक प्रामुख्याने उपस्थित होते.