▪️आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये सातत्याने ‘इनकमिंग’..
▪️गोंगपचे तालुकाध्यक्ष प्रकाश येडमे कार्यकर्त्यांसह भाजपात!

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक
राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : ३० राजुरा तालुक्यात भारतीय जनता पक्षात आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार ‘इनकमिंग’ सुरू आहे. आज गोंडवाना गणतंत्र पार्टीचे (गोंगाप) राजुरा तालुका अध्यक्ष प्रकाश येडमे यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे राजुरा तालुक्यातील भाजपचा संघटनात्मक विस्तार निश्चितच वाढणार असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपसाठी महत्वाचा असाच आहे. आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये येत असल्याचे चित्र सध्या संपुर्ण राजुरा विधानसभा मतदारसंघात सातत्याने दिसत आहे.
यावेळी मंचावर तालुकाध्यक्ष वामन तुराणकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील उरकुडे, सतीश कोमरवल्लीवार, हरीदास झाडे, बापुराव मडावी, शहराध्यक्ष सुरेश रागीट, मिलिंद देशकर, दिलीप गिरसावळे, अजय राठोड, दिपक झाडे, प्रदिप पाला, सचिन डोहे, सिनू उत्ननुरवार, रवी ठाकूर, प्रफुल घोटेकर, प्रदिप मोरे, सचिन भोयर, आकाश गंधारे, श्रीकृष्ण गोरे, सागर भटपल्लीवार, छबिलाल नाईक, सचिन बल्की, वैभव पावडे आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.