▪️महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त..
▪️नवजात शिशुंना साहित्य वाटप तसेच मोफत मोतीबिंदू शिबीराचे आयोजन ग्रामीण रुग्णालय परिसर..

*🔸श्री. कुणाल गरगेलवार*
*🔸चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी*
*🔸मो नं. 9356776439*
राजुरा – ( India 24 News ) : 22/07/2025 आमचे नेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी भारतीय जनता पार्टी राजुरा शहराच्या वतीने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात नवजात शिशुंना बेबी किट, फळ आणि चिल्ड्रेन मॉस्किटो नेटचे वितरण करण्यात आले. या स्नेहपुर्ण कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून नवजात शिशुंच्या मातांना साहित्य वाटले.
प्रसंगीच, मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र विशेष मोहीम अंतर्गत मोफत मोतिबिंदु तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचेही याठिकाणी माझ्याहस्ते राज्यस्तरीय उद्घाटन संपन्न झाले. आदरणीय देवेंद्रजींच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वातून महाराष्ट्राविषयीची आस्था, जनतेसाठी अपार तळमळ, आणि नवमहाराष्ट्र घडवण्याचा दृढनिश्चय क्षणोक्षणी दिसून येते. त्यामुळे त्यांचा वाढदिवसही सेवाभावी पद्धतीने साजरा व्हावा या उद्देशाने भाजपा राजुरा शहरच्या वतीने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करीत आदरणीय देवेंद्रजींच्या निरामयी दिर्घायुष्याची याठिकाणी प्रार्थना केली.
यावेळी माझ्यासमवेत जिल्हा महामंत्री विवेक बोढे, शहराध्यक्ष सुरेश रागीट, बाळनाथ वडस्कर, डॉ. अशोक जाधव, डॉ. कुळमेथे, सचिन डोहे, नितीन वासाडे, विनोद नरेन्दुलवार, माया धोटे, प्रिती रेकलवार, ममता केशेट्टीवार, सारीका शहा, पुणम शर्मा, स्वरुपा झंवर, भाऊराव बोबडे, किशोर रागीट, मंगेश श्रीराम, श्रीकृष्ण गोरे, मंगल चव्हाण, मनोहर निमकर, प्रफुल घोटेकर, छबिलाल नाईक, आकाश चिंचाळकर, सचिन भोयर, राजकुमार डाखरे, मयुर बोनगिरवार, आसिफ सय्यद, महेंद्र बुरडकर, अभिजित कोंडावार, वैभव पावडे, रोशन बंडेवार, सागर भटपल्लीवार, योगीता भोयर, महेश झाडे, मिथून थिपे, प्रणव मसादे, अमित डांगे, चेतन काटोले, मनोज मून, शुभम सुर्यवंशी, शुभम राखुंडे, आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.