▪️ज्येष्ठ शिक्षक अशोक कोहळे, ग्रथापाल दिलीप सहारे यांचा सेवापूर्ती सत्कार..

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्र्वशांती विद्यालय कुनघाडा रै येथील जेष्ठ शिक्षक अशोक कोहळे व ग्रंथपाल दिलीप सहारे हे सेवेतून निवृत्त झाल्यामुळे त्यांचा शाळेच्या वतीने सेवापूर्ती सत्कार करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय वामनराव पाटील गड्डमवार यांच्या प्रतिमेला मालार्पण व दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पाटील शृंगारपवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे प्राचार्य एस आर मेश्राम, सेवा निवृत्त पर्यवेक्षक सुरेश भांडेकर, पर्यवेक्षक धर्मेंद्र दुधे, जेष्ठ प्राध्यापक उल्हास आखाडे, सत्कार मूर्ती अशोक कोहळे, दिलीप सहारे व शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी पर्यवेक्षक धर्मेंद्र दुधे यांनी प्रास्ताविकातून अशोक कोहळे यांच्या सोबतचा विश्र्वशांती विद्यालय भेंडाळा येथील सहवास विशद करून, ग्रंथपाल दिलीप सहारे यांच्या सोबत विश्र्वशांती विविध सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांचा परिचय होता असे मत व्यक्त केले. गुरुदास कन्नाके यांनी सत्कारमूर्तींवर आपली स्तुतिसुमने उधळून, दिलीप सहारे यांची ग्रंथपाल म्हणून नियुक्ती प्रथमतः विश्र्वशांती विद्यालय सावली येथे झाली. ग्रंथालयात शांतता व स्वच्छता हा त्यांचा मूलभूत नियम होता. पुस्तक वितरणाच्या बाबतीत ते कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय होते. अशोक कोहळे यांचा सहवास आपल्याला सव्वीस महिन्याचा मिळाला. मात्र त्यातूनही त्यांची शेवटपर्यंत टिकणारी ऊर्जा व विद्यार्थिनिष्ठा शिकायला मिळाली असे सांगितले. दोन्ही सत्कारमूर्तींचा शाल, श्रीफळ व वस्तुभेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अशोक कोहळे यांच्या सोबत अर्धांगिनी कोकिळा व चिरंजीव उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना अशोक कोहळे म्हणाले की विश्र्वशांती विद्यालय कुनघाडा रै येथील शिक्षक वर्ग उत्कृष्ठ दर्जाचा असून, येथे येऊन माझे जीवन सार्थक झाले. सहवासाची शिदोरी सदैव माझ्या हृदयी राहील अशी त्यांनी ग्वाही दिली. शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मला भरभरून आपुलकी दिली व प्रेमाचा वर्षाव केला. ही प्रेमज्योत सदैव माझ्या हृदयात धगधगत राहील असे भावनिक उद्गार काढले. प्राचार्य एस आर मेश्राम यांनी अशोक कोहळे यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत आनंदाने काम करण्याच्या पद्धतीची भरभरून स्तुती केली व ग्रंथपाल दिलीप सहारे यांच्या कार्यालयीन सहकार्याची स्तुती केली .
कार्यक्रमाचे संचालन निलेश आसुटकर यांनी केले तर आभार योगेश धानोरकर यांनी मानले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख होमेश्वर बाळबुद्धे, प्रशांत मुप्पीडवार, प्रणित कोकोडे , सागर उरकुडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील संपूर्ण शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.



