▪️गौरीपुर ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा..
▪️अवैध दारू विक्री केल्यास ५१ हजार रुपये दंड..

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शि – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत गौरीपुर येथे २९ ऑगस्ट रोजी सरपंच हृदय रेवती बाला यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली असून महत्वाचे ठराव निर्गमित करण्यात आली. गावात अवैद्य दारू विक्री केल्यास विक्रेत्यांवर ५१ हजार रुपये दंड ठोकण्यात येईल असा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.
सभेत विविध विषय ठेवण्यात आले असून आर्थिक साक्षरता समुपदेशक जयपाल बावणे यांनी आर्थिक बाबीची जनजागृती केली. ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी तंटामुक्त समितिची निवड करण्यात येऊन अमरेश रमेन बिश्वास यांची अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. ग्रामपंचायत हद्दीतील गावातील तंटा गावातच मिटवून पारदर्शक न्याय निवाडा करण्याची जवाबदारी समितीने घेतली. गडचिरोली जिल्हा मागास असल्याने दारूबंदी असतांनाही ग्रामपंचायत अंतर्गत अवैध दारू विक्री चालू असल्याने सदर दारू विक्रेत्यावर ५१ हजार रुपये दंड घेण्याचा निर्णय घेण्यात आला. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनाच्या कामांची निवड करण्यात येऊन कामना मंजूरी प्रदान करण्यात आली. गौरीपुर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक एम.ए. डे यांचे स्थलांतरण झाल्याने त्यांच भावपूर्ण सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यरत तलाठी, वन विभाग, आरोग्य कर्मचारी, शिक्षक वृंद उपस्थित राहत नसल्याने ग्रामसभेचे उद्दिस्ट् साध्य होत नसल्याने तसेच कर्मचारी यांचेकडून ग्रामसभेची शिस्त भंग होत असल्याने त्यांची सविस्तर तक्रार करावयाची असल्याचे सरपंच हृदय बाला यांनी सांगितले.
ग्रामसभेची प्रस्तावना ग्रामपंचायत अधिकारी मंगेशकुमार वाळके यांनी मांडली ग्रामसभेला उपसरपंच महानंद हलदार, सदस्य असीम मुखर्जी, बेलराणी मंडल, नीतू निश्वास, सूचित्रा बाला, चन्दुना घरामी, ग्रामस्थ प्रीतीलता हृदय बाला, अमरेश शिल, समीर बराल, रमेन्द्र बाला आदि उपस्थित होते. ग्रामसभेचे आभार प्रदर्शन ग्रामपंचायत लिपिक मिनती शिल यानी केले. ग्रामसभा यशस्वी करण्यासाठी संगणक परिचालक संतोष बुरांडे, शिपाई अशोक मंडल, पाणी पुरवठा कर्मचारी असीम मंडल यांनी अधक परिश्रम केले.



