आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️कवितेच्या घरातर्फे बापुरावजी पेटकर काव्यसंग्रह पुरस्कार वितरण सोहळा आणि पुस्तक प्रकाशन समारंभ..

▪️येथे आमचाही श्वास कोंडतो आहे, भुकेचा केंद्रबिंदू.काय तसे मी करु या पुस्तकांना पुरस्कार..

मुख्य संपादक तथा संचालक श्री. तुळशीराम जांभुळकर

वरोरा – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक २० -०९-२०२५ कवितेचे घर,शेगांव बु द्वारा वर्ष २०२४-२०२५ या कालावधीत कविता,गझल आणि बालकविता अशा तीन विभागासाठी बापुरावजी पेटकर पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या पुरस्कारासाठी
महाराष्ट्र आणि इतर बाहेरील राज्यातूनही १५८ च्यावर संग्रह प्राप्त झालीत. प्रत्येक विभागासाठी रु ५०००/-असे पुरस्कार जाहीर केले होते. या सर्व पुस्तकांचे राज्यातील नामांकित कवी, समीक्षक, प्राध्यापक मंडळींनी परीक्षण केलेत. प्रभू राजगडकर,गजानन वाघमारे आणि प्रसेनजीत गायकवाड या कवीचे काव्यसंग्रह उत्कृष्ट ठरलीत. तसेच किरण भावसार, नंदकिशोर दामोदरे आणि मोहन काळे यांचे संग्रह विशेष
उल्लेखनीय ठरलीत.
घामाचे संदर्भ,किनारे सरकत आहे आणि एकदा आपणच व्हावे मोर अशा विशेष उल्लेखनीय संग्रहाचा सन्मान केला जाईल. कवितेचे घर शेगांव बु येथे तारीख ४ ऑक्टोबर रोजी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला प्रसिद्ध लेखक आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी डॉ.विनोद आसुदानी हे उपस्थित राहणार आहेत.तसेच प्रसिद्ध कवयित्री,लेखिका,अभिनेत्री मेघना साने या विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. गावातील उद्योजक प्रकाशजी पद्मावार हे हजर राहतील.
याच कार्यक्रमात मुंबई येथील कवी प्रा.भीमराव पेटकर यांच्या ‘ आयुष्याच्या वळणावर’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होईल.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सविता बगडे या करणार आहेत.

अशी माहिती कवितेच्या घराचे कार्यवाह डॉ.प्रमोद नारायणे यांनी दिली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.