आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️ महात्मा गांधी जयंतीनिमित्त “आदर्श पुरस्कार 2025” नागपूर नगरीत संपन्न..

▪️उद्योग चित्रपट व सत्यवेध न्यूज चॅनेल शुभारंभाने गाजला यहोवा यिरे फाऊंडेशनचा वर्धापनदिन..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

नागपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 02 ऑक्टोबर 2025) : वणामती कॅम्प धरमपेठ नागपूर मध्ये
महात्मा गांधी जयंती व यहोवा यिरे फाऊंडेशनचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात पार पडला. या औचित्याने “आदर्श पुरस्कार 2025”, “उद्योग चित्रपट” व “सत्यवेध न्यूज चॅनेल शुभारंभ” या त्रिसुत्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मा. डॉ. रामदास आठवले यांचे हस्ते होणार होते. मात्र नागपूरमधील व्यस्त कार्यक्रमामुळे ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. तरीही त्यांनी आपल्या पी.ए.मार्फत पुरस्कृतांना शुभेच्छा कळवल्या.

शिक्षण मंत्री मा. दादासाहेब भुसे यांचे शुभेच्छा संदेश :
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री मा. दादासाहेब भुसे यांनी खास शुभेच्छा संदेश पाठवला. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले की,
“यहोवा यिरे फाऊंडेशन समाजातील विविध क्षेत्रात आदर्शवत कार्य करत आहे. उद्योग, शिक्षण, आरोग्य, पत्रकारिता यामध्ये फाऊंडेशनचे योगदान प्रेरणादायी आहे. आदर्श पुरस्कार 2025 द्वारे समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव होणे ही अभिमानाची बाब आहे. तसेच ‘सत्यवेध न्यूज चॅनेल’ समाजातील सत्य व जबाबदार पत्रकारितेचा नवा दीप बनेल, याचा मला विश्वास आहे. या उपक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.” मान्यवरांची उपस्थिती :
या कार्यक्रमात अनेक नामवंत मान्यवर व सेलिब्रेटीज उपस्थित राहिले. सौ. सिमरन आहुजा – टीव्ही अँकर, इव्हेंट होस्ट व अभिनेत्री
सौ. एलिना तुटेजा – अभिनेत्री,
श्री. सुनिलकुमार मांडवे – महामंत्री, राष्ट्रीय उद्योग संघटन
डॉ. मनिष गवळी – टीसीए मेंबर, भारत सरकार, श्री. शेषराव अजगरे – सचिव, राम बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था, डॉ. विनोद चौधरी – प्राध्यापक, आयुर्वेद कॉलेज, ज्येष्ठ पत्रकार दलित मित्र डी.के. आरीकर चंद्रपूर
ज्येष्ठ पत्रकार – श्री. शामलाल जयदेव इंदौर, श्री. रितेश नायर – जनरल मॅनेजर, देशोन्नती न्युज पेपर, नागपूर , श्री. इरफान द्रवडी – जनरल मॅनेजर, BCN न्यूज चॅनेल व नागपूर मॅटो समाचार, श्री. प्रदीप मारोतकर – माइंड मास्टर व मेकअप आर्टिस्ट, श्री. शेख नदिम – प्राध्यापक, अकोला, श्री. फुलचंद भगत – पत्रकार, श्री. निखील पवार – रिपोर्टर, लोकमत टाइम्स, वाशीम, श्री. अशोक जाधव – अध्यक्ष, नागपूर टायगर एकता संघटना, चंद्रपूर, सौ. नेहा गोडबोले, कु. मोनालिशा – अँकर, सौ. गायत्री रोहणकर – मिस आशिया वर्ल्ड 2025 (विजेती, दुबई), सौ. सावी वासनिक – मेकअप आर्टिस्ट, श्री. सुशिल पांडे – संपादक, दर्पण पेपर, श्री. सचिन निमसे – सचिव, दर्पण पत्रकार संघटना, श्री. राजेंद्र पाटक – संपादक, पोलिस टाइम्स 24 न्यूज पोर्टल
सौ.राखी चव्हाण चेअरमन रायल सलुन मेकअप आर्टिस्ट नागपूर, श्री.नरेंद्र पिपळकर साहेब सहकार क्षेत्र महाराष्ट्र, श्री.राहुल जोगी ऑडिटर चंद्रपूर डिस्ट्रिक्ट सहकार क्षेत्र व कही क्षेञातील पाहुणे उपस्थित होते.
विशेष आकर्षण : “उद्योग चित्रपट” चे प्रभावी प्रदर्शन, ज्यामध्ये समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्वांचा कार्यप्रवास व उद्योगक्षेत्रातील योगदान दाखवण्यात आले.

“सत्यवेध न्यूज चॅनेल” चा शुभारंभ, ज्यामुळे पारदर्शक व जबाबदार पत्रकारितेला नवा आयाम मिळेल.

🏆 आदर्श पुरस्कार 2025 :
पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण, उद्योग, कला व सौंदर्य क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना यावेळी “आदर्श पुरस्कार 2025” ने गौरवण्यात आले.

अध्यक्षा सौ. एलिजा बोरकुटे यांचे मनोगत : यहोवा यिरे फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. एलिजा बोरकुटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले :
“फाऊंडेशनचा उद्देश समाजातील दुर्बल घटकांना बळ देणे, कर्तृत्ववानांना गौरविणे आणि सकारात्मक बदल घडवणे आहे. आदर्श पुरस्कार व उद्योग चित्रपट ही त्याची एक झलक आहे. तसेच ‘सत्यवेध न्यूज चॅनेल’च्या शुभारंभाने निःपक्ष, पारदर्शक व जबाबदार पत्रकारिता लोकांपर्यंत पोहोचेल, याचा आम्हाला अभिमान आहे.”

आभार प्रदर्शन :
फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांनी उपस्थित मान्यवर, पत्रकार, नागरिक व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले..
आप का साथ सब का विकास, शिका कमवा, प्रगती करा.. जय महाराष्ट्र

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.